वैशालीताई सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणूक साठी प्रचाराचे नारळ फोडून सुरुवात

वैशालीताई सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणूक साठी प्रचाराचे नारळ फोडून सुरुवात

आज दिनांक 08-04-2023 वार शनिवार रोजी श्री क्षेत्र कनाशी तालुका भडगाव जिल्हा जळगाव येथे सकाळी 9 वाजता सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणूक साठी प्रचाराचे नारळ फोडून सुरुवात करण्यात आली. तसेच भगवान श्रीकृष्ण व श्री चक्रधर स्वामी महाराज यांचे दर्शन घेऊन तेथील जनतेच्या आशीर्वाद घेतला. त्यानंतर पुढील प्रचाराची सुरुवात निंभोरा येथील आराध्य दैवत श्रीराम मंदिर येथे सुद्धा वैशालीताई व सर्व पदाचे पदाधिकारी व गणमान्य व वरिष्ठ नागरिकांनी प्रचाराचे नारळ फोडून निवडणुकीचे रणशिंग फुकले.याप्रसंगी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व सर्व पदाधिकारी, ज्येष्ठ श्रेष्ठ शिवसैनिक उपस्थित होते.