सौ सुमनताई गिरधर पाटील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना राजीव गांधी विद्यार्थी अपघात योजना लाभाचे वितरण
भडगाव:- येथील सौ सुमनताई गिरधर पाटील माध्यमिक विद्यालय या प्रशालेचा विद्यार्थी दिनेश दीपक पवार ७ वी या विद्यार्थ्यांचा उष्माघाताने अकस्मात मृत्यू झाला होता. त्याच्या पालकाला सौ छायाबाई दीपक पवार यांना व कु.अंजली राजेंद्र सोनार १२ वी ही विद्यार्थिनी पण अकस्मात मृत्यू पावली होती.तिचे पालक सौ.वैशाली राजेंद्र सोनार यांना देखील मायेची उब देऊन प्रत्येकी १.५०,०००,/- सानुग्रह अनुदान देऊन शालेय प्रशासनाने अनमोल सहकार्य केले. यावेळी पालकांना अश्रू अनावर झाले होते.संबंधित विभागाचे शिक्षणाधिकारी (योजना),वरिष्ठ लिपीक पवन पाटील,सौ,सुप्रिया चोखट,यांचे मार्गदर्शन लाभले.शालेय प्रशासन मुख्याध्यापक/ प्राचार्य अजयजी अहिरे,उपमुख्याध्यापिका छाया बिऱ्हाडे, उपप्राचार्य संदीपजी सोनवणे,पर्यवेक्षक एस एस महाजन,अशोक तायडे व योजना समन्वयक प्रा.एल के वाणी यांनी परिश्रम घेतले.धनादेश वितरण करतेवेळी माजी विद्यार्थी सौरभ देशमुख हे ही उपस्थित होते.या कार्याचा गौरव संस्थेचे अध्यक्ष मा.आ.दिलीप भाऊ वाघ,चेअरमन संजयजी वाघ, व्हाइस चेअरमन व्हि टी जोशी मानद सचिव महेशजी देशमुख व शालेय समिती चेअरमन दत्ताजी पवार ,विनयजी जकातदार, विजयजी देशपांडे व सर्व संचालक मंडळाने केला.
























