पाचोरा कन्या विद्यालय बारावीचा निकाल 83 टक्के
पाचोरा- येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक (मिठाबाई) कन्या विद्यालयातील बारावी कला शाखेचा निकाल 83.01% लागला असून गौरी ईश्वर धनगर हिने 69 मार्क मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.
कोंडवाडा गल्ली, पाचोरा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालयातील 53 पैकी 44 विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण झाल्या. घवघवीत यश संपादन करणाऱ्या प्रथम पाच विद्यार्थिनी पुढीलप्रमाणे
गौरी ईश्वर धनगर(69:00),
दिशा भगवान कोळी (64:83),
वैष्णवी रवींद्र खैरनार (64:00)
नयना हेमराज चौधरी (63:34)
कीर्ती कैलास दाभाडे (63:17),
झीनत असलम शेख (63:17)
संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत धैर्यशीलराव पवार, सेक्रेटरी श्रीमती रूपालीताई जाधव-पवार व प्राचार्य डॉ.शिवाजी शिंदे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थिनींना प्रा.रवींद्र चव्हाण, प्रा अंकिता देशमुख, प्रा. प्रतिभा परदेशी, प्रा. प्रतिभा पाटील व प्रा संगीता राजपूत यांचे मार्गदर्शन लाभले.

























