सोयगाव तालुक्यात अवैध लाकूड वाहतूक पकडली; ट्रकसह माल जप्त
सोयगाव प्रतिनिधी, दत्तात्रय काटोले
सोयगाव (दि. २८ एप्रिल २०२६): तालुक्यातील मौजे निमखेडी येथे अवैधरित्या लाकडाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर तातडीने कारवाई करत ट्रकसह लाकूड जप्त करण्यात आले.
वन परिक्षेत्र अधिकारी सोयगाव यांना मिळालेल्या माहितीनुसार, श्री. एम. एम. अली (वनपाल, बनोटी), श्री. एन. ए. मुलताने (वनरक्षक, वाडी) आणि कु. एस. एस. चौधरी (वनरक्षक, घोसला) यांच्या पथकाला घटनास्थळी रवाना करण्यात आले. निमखेडी परिसरात तपासणी दरम्यान MH 18 BG 6941 क्रमांकाचा ट्रक अवैध लाकूड वाहतूक करताना आढळून आला.
यानंतर पथकाने तत्काळ कायदेशीर कारवाई करून ट्रक व त्यातील लाकूड जप्त केले. ही कारवाई उपवनसंरक्षक (प्रा) छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक वनसंरक्षक सिल्लोड यांच्या सूचनेनुसार वन परिक्षेत्र अधिकारी ए. पी. मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
या कारवाईत वनपाल एम. एम. अली, वनरक्षक एन. ए. मुलताने, वनरक्षक एस. एस. चौधरी आणि मोहन चौधरी यांनी सक्रिय सहभाग घेतला.
वन विभागाच्या या कारवाईमुळे अवैध वृक्षतोड व लाकूड तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
फोटो, दत्तात्रय काटोले
























