Home महाराष्ट्र शहाजापूर (फलकेवाडी) येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन 

शहाजापूर (फलकेवाडी) येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन 

शहाजापूर (फलकेवाडी) येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

 

 

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

शेवगाव तालुक्यातील शहाजापूर (फलकेवाडी) येथे सालाबाद प्रमाणे या ही वर्षी दिनांक ३० एप्रिल ते ७ मे २०२६ या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.येळेश्वर संस्थानचे महंत ह.भ.प. रामगिरी महाराज येळीकर यांच्या मार्गदर्शना खाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.या सप्ताहात दररोज पहाटे ४ते५ काकडा भजन,सकाळी ६ ते७ विष्णू सहस्त्रनाम,१० ते १२ गाथा भजन, सायंकाळी ४ते५ प्रवचन,५ते६ हरीपाठ,रात्री ८.३० ते १०.३० या वेळेत हरी किर्तन या प्रमाणे कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली आहे.वरील काळात सर्व ह.भ.प. मंगलताई वैद्य,शाहु महाराज येवले,अंबादास महाराज क्षिरसागर, अंकिता महाराज हरवणे,विठ्ठल महाराज डोईफोडे,याची प्रवचने होणार आहेत.तर सर्व ह.भ.प.काका महाराज मुखेकर, हनुमंत महाराज, सुदर्शन महाराज शास्त्री,दुर्गाताई पोकळे,ज्ञानेश्वर महाराज तांबे, एकनाथ महाराज गाढे,बाळकृष्ण महाराज सुडके यांची किर्तने होणार आहेत.बुधुवार दिनांक ६/५/२०२६ रोजी गावातून दिंडी प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे.गुरूवार दिनांक ७ मे २०२६ रोजी सकाळी ८.३० ते १०.३० या वेळेत येळीच्या येळेश्वर संस्थानचे महंत ह.भ.प. रामगिरी महाराज येळीकर यांच्या काल्याच्या किर्तनाने आणि विष्णूपंत रामकृष्ण डोईफोडे यांच्या काल्याच्या महा प्रसादाच्या पंगतीने या सोहळ्याची सांगता होणार आहे.वरील सप्ताह काळात खंडागळे, डोईफोडे,नवले, फलके,शिंदे,नजन या परीवाराच्या वतीने अन्नदान करण्यात येणार आहे.या सप्ताहात गायनाचार्य म्हणून ह.भ.प.भागवत महाराज मरकड, संजय महाराज वारे,बडे भाऊसाहेब तर मृदंगाचार्य म्हणून शुभम महाराज डोईफोडे,आणि विठ्ठल महाराज डोईफोडे हे काम पाहणार आहेत.हार्मोनियमवर कुंडलिक महाराज शिंदे आणि ज्ञानेश्वर महाराज सोनवणे हे काम पाहणार आहेत.तरी पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्तांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थ,सोमेश्वर महिला व पुरुष भजनी मंडळ शहाजापूर ( फलकेवाडी)यांनी केले आहे.

Don`t copy text!