पाटील विद्यालयात जागतिक महिला दिन साजरा
भडगाव:~ येथील सौ सुमनताई गिरधर पाटील माध्यमिक विद्यालय व सौ जयश्री गणेश पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालयात ८ मार्च जागतिक महिला दिन आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक/प्राचार्य अजय अहिरे तर व्यासपीठावर , उपप्राचार्य संदीप सोनवणे, उपमुख्याध्यापिका सी व्हि बिऱ्हाडे, पर्यवेक्षक अशोक तायडे, मा.नगरसेविका सौ. योजनाताई पाटील, सौ.नूतन पाटील,सौ.महेश्वरी देशमुख,सौ. प्राजक्ता देशमुख, सौ संध्या घाडगे,श्रीमती न्याती, आर. जे कोसोदे उपस्थित होत्या.जागतिक महिला दिनानिमित्ताने श्रीमती रेखा कोसोदे यांना *निपुण माता पालक पुरस्कार* देऊन गौरविण्यात आले.
मनोगतपर भाषणातून सी व्हि बिऱ्हाडे यांनी बाबासाहेब आंबेडकर,सावित्रीबाई फुले,जिजाऊ माता यांचे अनेक उदाहरण देऊन उपस्थितांचे मन भारावून टाकले.सौ.योजनाताईनी भाषणातून १९११ पासून महिलांनी सर्वच क्षेत्रात प्राविण्य मिळवले आहे व आजही सन्मानाने कार्यरत आहेत असे मत प्रतिपादन केले. सौ प्राजक्ता देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले.भडगाव नगरीतील बहुसंख्य महिला कार्यक्रमास उपस्थित होत्या.सर्वांचा यथोचित सन्मान करून पुष्पगुच्छ देण्यात आले. अध्यक्षीय समारोपात अजयजी अहिरे यांनी आपल्या संस्थेने शाळेचे,कॉलेजचे,महाविद्यालयाचे नाव महिलांचेच असल्याने संस्थेने आधीच सन्मान केला असल्याचे मत प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नितीन सोनजे यांनी तर आभारप्रदर्शन अशोक तायडे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

























