Home महाराष्ट्र आमखेडा बारी समाजाला नवे नेतृत्व; संघटन बळकटीकरणाच्या दिशेने ठोस पाऊल

आमखेडा बारी समाजाला नवे नेतृत्व; संघटन बळकटीकरणाच्या दिशेने ठोस पाऊल

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["default"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

आमखेडा बारी समाजाला नवे नेतृत्व; संघटन बळकटीकरणाच्या दिशेने ठोस पाऊल

 

 

 

 

सोयगाव | प्रतिनिधी : दत्तात्रय काटोले

 

सोयगाव तालुक्यातील आमखेडा येथे अखिल भारतीय बारी संघाच्या वतीने नव्या पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, या निवडीमुळे आमखेडा  परिसरातील बारी समाजाच्या संघटनात्मक बांधणीला नवे बळ मिळाले आहे. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध आणि अभ्यासू नेतृत्वाची निवड झाल्याने समाजात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

अखिल भारतीय बारी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेशजी घोलप तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष रतनजी फुसे यांच्या अध्यक्षतेखाली ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. या वेळी आमखेडा  बारी समाज अध्यक्षपदी डॉ. रघुनाथ काशीराम फुसे यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी गजानन लक्ष्मण ढगे, सहसचिवपदी मनोज रघुनाथ आगे आणि सचिवपदी रामदास लाडूबा फुसे सर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.

 

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी समाजातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे, युवकांना संघटित करून समाजकार्याची दिशा देणे, तसेच सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी ठोस उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला. समाजातील शिक्षण, रोजगार, शासकीय योजनांचा लाभ, तसेच सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करण्यासाठी संघटन अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

या नव्या नेतृत्वामुळे बारी समाजात एकजूट वाढून समाजहिताची कामे गतिमान होतील, असा विश्वास समाजबांधवांकडून व्यक्त करण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिक, युवक, महिला व मित्रमंडळींनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.

 

समाजाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रित येऊन कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करत “एकता, संघटन आणि प्रगती” हा संदेश यावेळी देण्यात आला. नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून आमखेडा व सोयगाव परिसरातील बारी समाज विकासाच्या नव्या पर्वाकडे वाटचाल करेल, असा आशावाद व्यक्त होत आहे.

 

1) डॉ. रघुनाथ काशीराम फुसे ,अध्यक्ष

 

2) श्री. गजानन लक्ष्मण ढगे ,उपाध्यक्ष

 

3) श्री. मनोज रघुनाथ आगे, सह सचिव

 

4) श्री. रामदास लाडूबा, फुसे सर ,सचिव

 

फोटो, दत्तात्रय काटोले

 

Don`t copy text!