दुचाकींचा सामोरा समोर अपघातात दोन महाविद्यालयीन तरुण जागीच ठार; दोन जखमी

दुचाकींचा सामोरा समोर अपघातात दोन महाविद्यालयीन तरुण जागीच ठार; दोन जखमी

पाचोरा(वार्ताहर) दि, १
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील रस्त्यावर भोजे गावाजवळ दोन दुचाकींचा सामोरा समोर अपघात होऊन दोन महाविद्यालयीन तरुण जागीच ठार झाल्याची घटना सुमारे ११.१५ वाजेच्या सुमारास घडली दरम्यान मयतामध्ये नरेंद्र भगवान गव्हाळे वय २०,रा.चिंचपुरे ता.पाचोरा व जीवन संतोष कदम वय १७ रा.भोजे ता.पाचोरा या तरुणांच्या नावांचा समावेश असून इतर दोन जखमी जखमी तरुण बबन तडवी वय २५ व जब्बार तडवी वय ४५ हे गंभीर जखमी झाले आहेत. ते पाचोरा येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

अपघात झालेल्या दोन्ही दुचाकींचे क्रमांक एम एच १९ डी ए ०३६१ व एम एच १९- १४३६ असे असून
अपघाताचे वृत्त कळताच १०२ रुग्णवाहिका चालक बाजीराव गीते यांनी चौघांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात भरती केले दरम्यान पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षकक डॉ अमित साळुंखे यांनी दोघांना मृत घोषित केले आहे.दरम्यान घटनेचे वृत्त कळताच जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील, भारतीय जनता युवा मोर्चाचे परेश पाटील यांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली होती.तर अपघातस्थळी पिंपळगाव पोलीस स्टेशनचे रणजित पाटील, अरुण राजपूत, संदीप राजपूत,सचिन वाघ या कर्मचाऱ्यांनी धाव घेत रुग्णवाहिका बोलावत जखमींना पाचोरा रुग्णालयात पाठवत वाहतूक सुरळीत केली .