सौ. सु.गी. पाटील मा.विद्यालय भडगाव व सौ.ज.ग. पूर्णपात्री कला, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम अंतर्गत नवरात्र उत्सव सप्ताह 2023 -24 च आयोजन

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. सु.गी. पाटील मा.विद्यालय भडगाव व सौ.ज.ग. पूर्णपात्री कला, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम अंतर्गत नवरात्र उत्सव सप्ताह 2023 -24.चेआयोजन

पाचोरा(प्रतिनिधी)
प्राचार्य श्री विश्वासराव साळुंखे . मार्गदर्शनाने केले आहे त्यानुसार *आज दिनांक 19 ऑक्टोबर रोजी या सप्ताहाचे पाचवे पुष्प गुंफण्यात आले. या पुष्पात एक छोटेखानी कार्यक्रम घेऊन व्याख्यान:- ” स्त्री जन्मा तुझी ही कहाणी “* आयोजित करण्यात आले. अध्यक्ष स्थानी मा.उपप्राचार्य श्री संदीप सोनवणे होते. व्याख्याता म्हणून सौ. हेमलता श्यामकांत पाटील. मॅडम लाभल्या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मंजुषा पाटील. मॅडम यांनी केले.व्याख्यात्यांचा परिचय श्रीमती रेखा कसोदे मॅडम यांनी करून दिला. तर आभार प्रदर्शन श्री सुयोग झवर सर यांनी केले.सौ. हेमलता पाटील मॅडम यांनी आपल्या व्याख्यानात पुरातनातील, रामायणातील आणि महाभारतातील अनेक दाखले देत खूप सुंदर रित्या आजचे पुष्प गुंपले. जी आदिशक्तीची विविध रूपे आहेत महाकाली ,महालक्ष्मी, महासरस्वती यांच्याकडून कोणकोणते गुण आजच्या मुलींनी घ्यावे.आपले भावी आयुष्य कशा पद्धतीने सुंदर करावे हे सांगितले. अनेक उदाहरणे देत सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाला गोसावी काकांनी अनमोल सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनींचे व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.