Home महाराष्ट्र सोयगाव तालुक्यासह महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

सोयगाव तालुक्यासह महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

सोयगाव तालुक्यासह महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

 

 

सोयगाव ता .१५ : तालुक्यासह विविध ठिकाणी दि.१४ एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. गलवाडा येथे ग्रामपंचायत सदस्य सुशीलाबाई इंगळे यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

यानंतर सायंकाळी सहा वाजता शिवाजीनगर (प्लॉट) येथून जयंती मिरवणुकीला सुरुवात झाली. ‘जय भीम’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. नाचत-गात, फटाक्यांच्या आतिषबाजीत गावात मिरवणूक काढण्यात आली. रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम उत्साहात पार पडला. जयंती सोहळा शांततेत पार पडण्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 

या वेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमात भारत तायडे, जितेंद्र सोनवणे, भारत सोनवणे, किरण इंगळे, रणवीर इंगळे, विश्वजित सोनवणे, पुंडलिक तायडे, अक्षय औरंगे,गोपाल इंगळे, नामदेव जाधव, जीवन पाटील, प्रभाकर इंगळे, मिलिंद सोनवणे, संतोष सोनवणे, ज्ञानेश्वर सोनवणे, राहुल इंगळे, सुशीलाताई इंगळे, मायाबाई जगताप, अनिता सोनवणे, शोभाबाई मगरे, रेखाबाई सोनवणे, अनु सोनवणे आदी उपस्थित होते.

 

Don`t copy text!