Home महाराष्ट्र अहिल्यानगर जिल्ह्यात मोटारसायकल चोरणारी श्रीरामपूरची टोळी पोलिसांनी रंगेहाथ पकडली, त्यांच्या कडून १२...

अहिल्यानगर जिल्ह्यात मोटारसायकल चोरणारी श्रीरामपूरची टोळी पोलिसांनी रंगेहाथ पकडली, त्यांच्या कडून १२ मोटार सायकल गाड्या जप्त

अहिल्यानगर जिल्ह्यात मोटारसायकल चोरणारी श्रीरामपूरची टोळी पोलिसांनी रंगेहाथ पकडली, त्यांच्या कडून १२ मोटार सायकल गाड्या जप्त

 

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

या बाबदची घटना अशी की,पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेले फिर्यादी दत्तात्रय भागवत म्हस्के (वय २८ वर्षे) राहणार रेणुकईवाडी तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर यांची जागतिक महिला दिनाच्या दिवशी म्हणजे दिनांक ०८ मार्च २०२६ रोजी अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मीरी तिसगाव रोडवर असलेल्या रेणुकाईवाडी येथे लावलेली मोटार सायकल नंबर एम.एच.१६. सी.एल. १३६५

हि कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली होती. या संदर्भातील सदर घटनेबाबत पाथर्डी पोलीस स्टेशन मध्ये गु. र. नं. ३४७/२०२६ भारतीय न्याय संहितेचे २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अहिल्या नगर जिल्ह्यात मोटार सायकल चोरीच्या अनेक घटना वाढत असल्याने अहिल्या नगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी,यांना या गुन्ह्याचा तपास करून सदर आरोपींचा शोध घेवुन कारवाई करण्या बाबत आदेश दिले होते.त्यानुसार पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक पोलिस निरीक्षक हरिष भोये साहेब, पोलिस सब इन्स्पेक्टर संदिप मुरकुटे व पोलीस अंमलदार दिपक घाटकर,सुरेश माळी,अतुल लोटके,विष्णु भागवत,फुरकान शेख,बाळासाहेब नागरगोजे,रिचर्ड गायकवाड, रमिजराजा अत्तार,विशाल तनपुरे,प्रशांत राठोड,अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ,भगवान थोरात,योगेश कर्डीले,प्रकाश मांडगे,महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत, चालक भगवान धुळे,अरुण मोरे यांचे एक पोलीस पथक तयार करुन,घडलेल्या घटनेचा तपास करण्यासाठी त्यांना सुचना व मार्गदर्शन करुन पोलिस पथक रवाना केले होते.

हे पोलिस पथक जिल्ह्यातील मोटार सायकल चोरीच्या गुन्हयातील आरोपींची माहिती काढत असताना नमुद गुन्ह्यातील मोटार सायकल चोरणारे पोलिस रेकॉर्डवरील आरोपी महेश कांदळकर, राहणार, अशोकनगर तालुका , श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर याने त्याच्या साथीदारांना सोबत घेऊन अनेक मोटार सायकलींची चोरी केली असुन ते चोरीच्या मोटार सायकली विक्री करण्यासाठी श्रीरामपुर येथे येणार असल्याची माहिती गुप्त खबऱ्या मार्फत मिळाली होती. त्यानंतर पोलिस पथक हे अशोकनगर परिसरात रेल्वेच्या पुलाखाली सापळा रचून थांबले असता त्यांना दोन मोटार सायकलीवर चौघे जण नावे १) महेश कांदळकर (वय २४ वर्षे) राहणार , जाधववस्ती, अशोकनगर, तालुका,श्रीरामपुर, जिल्हा अहिल्यानगर,२) अजय कांदळकर (वय २२ वर्षे) राहणार , जाधववस्ती, अशोकनगर, तालुका,श्रीरामपुर,जिल्हा अहिल्यानगर,३) जावेद बेग,(वय १८ वर्षे) राहणार, अशोकनगर, निपाणी वडगाव रोड,तालुका , श्रीरामपुर, जिल्हा अहिल्यानगर ४) विकास जाधव (वय१९ वर्षे) राहणार जाधववस्ती, अशोकनगर, तालुका,श्रीरामपुर, जिल्हा अहिल्यानगर, हे जाताना दिसले . त्यांना ताब्यात घेऊन त्याच्या कडे कसुन चौकशी केली असता त्यांनी मोटार सायकली चोरी केल्याचे सांगितले. या सर्वांना मग पोलिस पथकाने ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपी कडे मिळुन आलेल्या दोन मोटार सायकली बाबत विचारपुस केली असता त्यांनी सदरच्या दोन्ही मोटार सायकली चोरून आणल्या असल्याचे सांगितले होते. ताब्यात घेतलेल्या आरोपी कडे अजून कसुन चौकशी केली असता ते पोपटा प्रमाणे बोलू लागले.पोलीसांनी त्यांना विश्वासात घेवुन खोलात जाऊन अधिक विचारपुस केली असता त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी यात्रेतुन, नगर तालुक्यातील देहरे टोल नाका येथुन,संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर या ठिकाणावरुन आणखी १० मोटार सायकलीची चोरी केल्याचे सांगितले होते.सर्व आरोपीं कडुन एकुण ३ लाख २९ हजार रूपये किंमतीच्या एकुण १२ मोटार सायकली, आणि ३४,००० रुपये किंमतीचे ५ वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल व पक्कड असा एकुण ३,५३,१०० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत करून जप्त केला आहे.पोलीसांनी सर्व आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. सदर संशयित आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्या कडून अजून काही माहिती मिळते का याचा शोध पोलिस घेत आहेत.जिल्ह्यात मोटार सायकली चोरांच्या अनेक टोळ्या असुन त्यांचाही शोध घेऊन त्यांच्या पोलिसा मार्फत मुसक्या आवळल्या गेल्या पाहिजेत असं सर्व सामान्य नागरिकांना वाटू लागले आहे.

Don`t copy text!