पाचोरा तालुक्यात परिवर्तनाचा नारा : शिवसेना-उबाठा शाखांचा शुभारंभ वैशालीताई सुर्यवंशी यांच्या आवाहनाला जनसामान्यांचा प्रतिसाद

पाचोरा तालुक्यात परिवर्तनाचा नारा : शिवसेना-उबाठा शाखांचा शुभारंभ
वैशालीताई सुर्यवंशी यांच्या आवाहनाला जनसामान्यांचा प्रतिसाद

पाचोरा, दिनांक १७ ( प्रतिनिधी ) : पाचोरा-भडगाव मतदारसंघात परिवर्तनाचा नारा बुलंद करत मैदानात उतरलेल्या शिवसेना-उबाठा पक्षाच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी गावोगावी शाखा उघडण्याचा धडाका सुरू केला असून आज देखील त्यांनी नऊ गावांमध्ये शाखांचे उदघाटन केले.

पाचोरा-भडगाव मतदारसंघात वैशालीताई नरेंद्र सूर्यवंशी यांनी तगडे आव्हान उभे करतांना जनसामान्यांशी थेट संपर्क सुरू करतांनाच गाव तिथे शाखा हा उपक्रम सुरू केला आहे. याच्या अंतर्गत आजवर ७० पेक्षा जास्त शाखांचा शुभारंभ करण्यात आला असून आज देखील त्यांनी तालुक्यात शाखांचे उदघाटन केले. यात प्रामुख्याने दुसखेडा, वडगाव खुर्द, हडसन व मोहाडी या गावांमध्ये प्रत्येकी एक पहाण व आसनखेडा गावात प्रत्येकी दोन तर नांद्रा गावात तीन शाखांचा शुभारंभ केला.

प्रत्येक शाखेच्या ठिकाणी वैशालीताईंचे ढोल-ताशांचा गजर आणि जोरदार जयघोषांमध्ये स्वागत करण्यात आले. यात तरूणाईसह महिला वर्गाचा विशेष सहभाग दिसून आला. शाखा हा आपल्या पक्षाचा आत्मा असून याच्या मजबुतीकरणाला प्राधान्य देण्याचे नमूद करतांनाच वैशालीताई सूर्यवंशी यांनी आगामी काळातील निवडणुकांसाठी सर्वांनी सज्ज राहण्याचे आवाहन केले. प्रत्येक शाखेच्या पदाधिकार्‍यांनी परिसरातील जनतेच्या विविध समस्यांचे निराकरण करण्याला आपले आद्य कर्तव्य समजावे असेही त्या म्हणाल्या. तर, आगामी काळात याच शाखांच्या माध्यमातून जनहिताची कामे करण्यात येतील असे प्रतिपादन देखील केले. उपस्थितांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला.

याप्रसंगी वैशालीताई सूर्यवंशी यांच्या सोबत पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपक राजपूत, उपजिल्हा प्रमुख, उद्धव मराठे, तालुकाप्रमुख शरद पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक राजीव काळे परधाडे; सावकार दादा, सुनील पाटील, अमरसिंग पाटील, अशोक कुमावत, मनोज पाटील, खेडगाव नंदीचे सचिन पाटील, मुन्ना संघवी, अशोक पितांबर पाटील, श्रीराम ढमाले, किरण पाटील, हडसन येथील देवा भाऊ, बापू पाटील, नितीन महाजन, संजय ठाकरे, अशोक महाजन, एकनाथ महाराज, आप्पा पाटील, विनोद आप्पा बाविस्कर नांद्रा, आनंदा पाटील नांद्रा, राजू भैय्या, रवींद्र पोपट पाटील, कैलास पाटील, प्रवीण पाटील, हेमराज पाटील, समाधान पाटील, गफार भाई, राजेंद्र राणा, अभिषेक खंडेलवाल यांच्यासह समस्त ग्रामस्थ व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.