पाचोरा महाविद्यालयाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात रस्ता सुरक्षापर मार्गदर्शन

पाचोरा महाविद्यालयाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात रस्ता सुरक्षापर मार्गदर्शन

पाचोरा दि. 06 – प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव संलग्नित पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराच्या पाचव्या दिवशी दि. 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2024 या दरम्यान प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव यांचे सुरू असलेले रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत रस्ता सुरक्षा व चालकांच्या नियमांसाठी मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यार्थी विकास अधिकारी मा. डॉ. एस. बी. तडवी हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथील मोटार वाहन निरीक्षक मा. श्री. सौरभ पाटील यांनी स्वयंसेवकांना रस्ता सुरक्षा, वाहन चालकाचे नियम व रस्ता सुरक्षेसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दिले जाणारी निर्देश या विषयावर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी त्यांच्यासोबत सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मा. श्री. उमेश सोलापुरे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मा. श्री. महेश सहाने, वाहन चालक श्री. किशोर मोघे, श्री.हनिफ शेख शरीफ शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष जि.प. शाळा,खडकदेवळा, मुख्याध्यापक श्री.रविंद्र शिंदे, राष्ट्रीय सेवा योजना विभागीय समन्वयक प्रा. वाय. बी. पुरी, रासयो कार्यक्रम अधिकारी प्रा. आर. बी. वळवी, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. क्रांती सोनवणे, सहा. कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील भोसले, डॉ. शारदा शिरोळे, प्रा. अमित गायकवाड, प्रा. सुनील पाटील, प्रा. श्वेता देव, प्रा. शीतल पाटील, श्री. ऋषिकेश ठाकूर, श्री. संतोष महाजन, श्री. रवींद्र चौधरी, श्री. अभिषेक जाधव, श्री. एन. टी. पाटील, श्री. सुधाकर पाटील, श्री. यश सूर्यवंशी व मोठ्या संख्येने स्वयंसेवक-स्वयंसेविका उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवक-स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.