कोपरे येथे राजकुमार घुले सर तर वृद्धेश्वर साखर कारखाना येथे वैष्णवी बनसोड यांच्या काल्याच्या किर्तनाने संत “वामनभाउ पुण्यतिथी” सोहळ्याची सांगता

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) महाराष्ट्रातील वंजारी समाजाला आध्यात्माचा वारसा देणारे आराध्य दैवत वै.ह.भ.प.संत वामनभाउ महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याची सांगता संपन्न झाली.कोपरे येथे संत भगवानबाबा आणि संत वामनभाउ मंदिरात ह.भ.प. प्रवचनकार राजकुमार घुले सर यांचे प्रवचन झाले.त्यांनी संत वामनभाउच्या जिवनातील सत्य आठवणी सांगून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.गंगा भागीरथी श्रीमती सिताबाई धोंडीबा आव्हाड यांच्या संकल्पनेतून उभे राहिलेल्या संत भगवानबाबा आणि संत वामनभाउ मंदिरात हा प्रवचन रूपी सोहळा संपन्न झाला.यावेळी गावातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.वृद्धेश्वर साखर कारखाना येथिल शिरसाट वस्तीवरही संत वामनभाउ पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.ह.भ.प. वैष्णवी बर्डे यांचे शनिवारी रात्री तर ह.भ.प.वैष्णवी महाराज बनसोड पैठणकर यांचे रविवारी सकाळी काल्याचे किर्तन झाले.दरवर्षी रामभाऊ शिरसाट यांच्या आशीर्वादाने हा सोहळा साजरा करण्यात येतो. पैठण येथील बालसंस्कार केंद्रातील छोट्या मुलींचे टाळ मृदंग वादन पाहून शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या हॅट्ट्रिक आमदार मोनिकाताई राजळे यांनीही पैठण येथील ह.भ.प. वैष्णवी महाराज बनसोड यांचे काल्याचे किर्तन ऐकून बनसोड दीदीचे कौतुक केले.आमदार ताई यांनी यावेळी सहकार महर्षी स्व.दादापाटील राजळे यांच्या आध्यात्माची आठवण करून दिली.त्यांनीही त्या काळात कासार पिंपळगाव येथे श्रीकृष्ण बालसंस्कार केंद्र स्थापन करून अनेक लहान मुलांना टाळ मृदंग वाजवण्यात तरबेज केले होते असे सांगितले.या सोहळ्यासाठी ह.भ.प.मच्छिंद्र महाराज चितळे,केशव महाराज गुजर आव्हाणेकर, पांडुरंग महाराज खरड,बाबासाहेब शिरसाट, आदिनाथ शिरसाट,जनार्दन शिरसाट,सुखदेव शिरसाट, सोमनाथ शिरसाट,अशोक शिरसाट,आणि गणेश शिरसाट यांनी विशेष परिश्रम घेतले. महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली.























