Home पाचोरा तालुका डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यालयास वीस हजार रुपये किमतीची पुस्तके सप्रेम...

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यालयास वीस हजार रुपये किमतीची पुस्तके सप्रेम भेट

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यालयास वीस हजार रुपये किमतीची पुस्तके सप्रेम भेट

 

विश्वरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त सौ सु गी पाटील माध्यमिक विद्यालय व सौ ज ग पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय अभ्यासक्रम विभाग भडगाव येथे शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ सी व्ही बिऱ्हाडे मॅडम यांचेकडून 20 हजार रुपये किमतीची महापुरुषांच्या चरित्रांची पुस्तके शाळेच्या ग्रंथालयास प्रदान करण्यात आली.”जर तुमच्याकडे दोन रुपये असतील, तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या. कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल, तर पुस्तक कसे जगायचे हे शिकवेल”डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या याच विचारांचा अंगीकार करून वाचन संस्कृती जोपासण्याच्या दृष्टीने सौ बिऱ्हाडे मॅडम यांनी अत्यंत स्तुत्य पायंडा निर्माण केल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक /प्राचार्य श्री ए बी अहिरे सर यांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वाचनास प्रवृत्त करण्यासाठी आवाहन केले.

राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात करून प्रतिमापूजन संपन्न झाले. उपस्थितांमध्ये पर्यवेक्षक श्री शरद महाजन उपमुख्याध्यापिका सौ बिऱ्हाडे मॅडम, प्राचार्य श्री ए बी अहिरे यांनी मनोगत व्यक्त केले. उपप्राचार्य श्री संदीप सोनवणे व पर्यवेक्षक श्री ए बी तायडे यांच्या उपस्थितीत सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

Don`t copy text!