उर्दू कन्या केंद्र शाळा येथे एक दिवसीय उर्दू वाचन अभियान संपन्न

उर्दू कन्या केंद्र शाळा येथे एक दिवसीय उर्दू वाचन अभियान संपन्न

महाराष्ट्र शासनाच्या, महाराष्ट्र वाचन चळवळ अंतर्गत उर्दू वाचन अभियान साठी जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळा पाचोरा येथे एक दिवसीय प्रशिक्षणाच्या आयोजन गट साधन केंद्र पाचोरा च्या वतीने करण्यात आला. ह्या प्रशिक्षण मध्ये कृतीच्या माध्यमातून शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले की वाचन म्हणजे काय?शाळेतील विद्यार्थ्यांनी वाचन कसा करावा? वाचनच्या उद्देश काय? वाचन साठी साधन कोणते?यावेळी गोराडखेडा उर्दू केंद्राचे सर्व शिक्षकांना सहा ग्रुप मध्ये विभाजित करण्यात आला.जिला स्तरावरुन मिळालेले आदेशाअन्वये दर बुधवार व शनिवार वीस मिनिट उर्दू भाषेच्या वाचन प्रत्येक शाळांनी करावी व उर्दू भाषेची गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करावी, असे मार्गदर्शन करण्यात आले. जमजम ग्रुपने उत्कृष्ट कार्य केल्याने केंद्रप्रमुख मार्फत त्यांचे कौतुक करण्यात आले व ग्रुपचे उत्कृष्ट कृतींना जिल्हा स्तरावर अपलोड करण्यात आले.जमजम ग्रुप मध्ये सलमान शौकत,मोमीन फैसल, इस्माईल सुलेमान,जाकीर खाटीक, मुख्याध्यापक अब्दुल एजाज,इरफान खान, अश्फाक शेख, रईस सुबहान, शेख जावेद रहिम यांनी उत्कृष्ट कार्य दाखवला. ह्या प्रशिक्षणाचे तालुका सुलभक व उर्दू वाचन दुत आसिफ जलील, कदिर शब्बीर तसेच सलाईड प्रोजेक्टर दुत अल्ताफ कुरेशी उपस्थित होते.