पाचोरा येथील Shree Samarth Pro Active Abacus Classes चे 15 विद्यार्थी वेगवेगळ्या लेव्हल तसेच क्लास कॅटेगरी मधून ट्रॉफी विनर

पाचोरा येथील Shree Samarth Pro Active Abacus Classes चे 15 विद्यार्थी वेगवेगळ्या लेव्हल तसेच क्लास कॅटेगरी मधून ट्रॉफी विनर

 

 

25 नोव्हेंबर 2023 रोजी धुळे येथे झालेल्या
Proactive Abacus Pvt. Ltd. आयोजित National Competition( Regional Level) 🧮 मध्ये तीन जिल्ह्यांतून 1100 विद्यार्थी सहभागी झाले होते यामध्ये Shree Samarth Proactive Abacus Classes , Pachora मधून 67 विद्यार्थी सहभागी झाले होते. या Competition मध्ये 6 मिनिटात 100 गणिते सोडवायचे होते. त्यामध्ये पाचोरा येथील Shree Samarth Pro Active Abacus Classes चे 15 विद्यार्थी वेगवेगळ्या लेव्हल तसेच क्लास कॅटेगरी मधून ट्रॉफी विनर ठरले. यामध्ये प्रामुख्याने आयुष योगेश पाटील या विद्यार्थ्यांने लिटिल चॅम्प बुक वन मधून प्रथम क्रमांक मिळवला आहे. आर्यन चंदन राजपूत या विद्यार्थ्याने तिसरा क्रमांक तसेच यक्षिका हर्षल पाटील या विद्यार्थिनीने पाचवा क्रमांक मिळवला आहे. लिटिल चॅम्प बुक टू मधून देवयानी मदनसिंग राजपूत या विद्यार्थिनीने दुसरा क्रमांक ,देवेंद्र मदनसिंग राजपूत या विद्यार्थ्याने चौथा क्रमांक मिळवला आहे. लिटिल चॅम्प बुक थ्री मधून सिद्धेश प्रदीप पाटील या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक, आर्यन अशोक बावचे या विद्यार्थ्याने चौथा क्रमांक मिळवला आहे. लेव्हल वन इयत्ता तिसरीमधून समिक्षा दीपक पाटील या विद्यार्थिनीने पाचवा क्रमांक, कार्तिक नितीन वाणी या विद्यार्थ्याने लेव्हल वन इयत्ता तिसरी मधून प्रथम क्रमांक,मनीष कन्हय्या पाटील या विद्यार्थ्याने इयत्ता पाचवी मधून दुसरा क्रमांक, तनस्वी रविंद्र पाटील या विद्यार्थिनीने इयत्ता पाचवी मधून तिसरा क्रमांक, रूद्रानी विशाल दिक्षित या विद्यार्थिनीने इयत्ता सहावी मधून चौथा क्रमांक, अयान असलम पिंजारी या विद्यार्थ्याने इयत्ता चौथी लेव्हल वन मधून प्रथम क्रमांक, विराज मंजित चंदन या विद्यार्थ्याने लेव्हल टू मधून तिसरा क्रमांक मिळवला आहे.हिंदवी दिनेश तावडे या विद्यार्थिनीने लेव्हल थ्री मधून तिसरा क्रमांक मिळवला आहे.वरील विद्यार्थ्यांची कोल्हापूर येथे राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे .तसेच 39 विद्यार्थी हे “Best Performance“ मुळे Gold Medal 🏅चे मानकरी ठरले.
त्याचप्रमाणे Abacus क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत असल्याने या वर्षीचा जळगाव जिल्ह्यातील ”Best Center Award Shree Samarth Pro Active Abacus Classes ला मिळाला . त्यामुळे मास्टर ट्रेनर आणि सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे पालकांकडून कौतुक तसेच अभिनंदन केले जात आहे. या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना Abacus क्लासचे मास्टर ट्रेनर – श्री रविंद्र पाटील सर ( 7507277008), श्रीमती सपना शिंदे मॅडम यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.