Home महाराष्ट्र राहुरी पोट निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार गोविंद मोकाटे यांच्या प्रचाराचा वृद्धेश्वर येथे...

राहुरी पोट निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार गोविंद मोकाटे यांच्या प्रचाराचा वृद्धेश्वर येथे शुभारंभ संपन्न

राहुरी पोट निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार गोविंद मोकाटे यांच्या प्रचाराचा वृद्धेश्वर येथे शुभारंभ संपन्न

 

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

राहुरी विधानसभा मतदारसंघात २३ एप्रिल रोजी पोट निवडणुक होत आहे.महाविकास आघाडीचे उमेदवार गोविंद मोकाटे यांच्या प्रचाराचा श्रीक्षेत्र वृद्धेश्वर येथे महाआरती करून शुभारंभ करण्यात आला.प्रारंभी उमेदवार मोकाटे यांच्या हस्ते विधीवत महापुजा करण्यात आली. उबाठा शिवसेनेचे नेते शशिकांत गाडे सर,राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे नगर तालुकाध्यक्ष उद्धवराव दुसुंगे, पाथर्डी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, राष्ट्रीय काँग्रेसचे संतोष म्हस्के, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नंदराज कुटे,रघुनाथ झीने,हे आवर्जून उपस्थित होते.महापुजा झाल्या नंतर वृध्देश्वर मंदिरा जवळील सभागृहात कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.त्या मेळाव्यात विरोधकांनी मोकाटे कुटुंबातील सदस्यांना कसा त्रास दिला याचा पाढाच वाचण्यात आला.गेल्या निवडणुकीत जेउर येथुन निवडून आलेल्या मोकाटे अण्णा यांच्या सुकन्या भाग्यश्री मोकाटे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून पाच वर्षे कसा त्रास दिला याचा उहापोह करण्यात आला.उमेदवार गोविंद मोकाटे म्हणाले की गेली पाच वर्षे विरोधक म्हणून मलाही फार मोठ्या प्रमाणात त्रास दिला गेला.पण माझ्या मुलीने काय केले होते म्हणून तीला त्रास दिला.त्याचा सारा हिशोब आता चुकता करण्याची वेळ या निवडणुकीत आली आहे परंतु तुमची साथ मला हवी आहे असे मोकाटे म्हणाले त्याच वेळी उपस्थितांनी हात उंचावून होकार दिला होता.शिवसेनेचे नेते शशिकांत गाडे सर म्हणाले की मी आणि उद्धव दुसुंगे नगर तालुक्याची जबाबदारी घेतो.राजळे,कुटे,पाठक,दुसंग, कोरडे,झाडे यांनी पाथर्डीतील ३९ गावाची जबाबदारी घ्यावी.राहुरी तालुक्या साठी उमेदवारी वरून नाराज झालेली शरदचंद्र पवार यांच्या गटाची राष्ट्रवादी काँग्रेस भरभक्कम आहे. सुप्रिया सुळे, जयंत पाटील, शरदचंद्र पवार, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, यांच्या सभा घेण्या साठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विरोधातील उमेदवाराला आता दुध पाजले तर भविष्यात तो दंश केल्या शिवाय राहणार नाही असाही टोला मोहोजचे निवृत्त मुख्याध्यापक कुंडलिक मचे सर यांनी मारला. माजी आमदार स्व. कर्डिले साहेब यांच्या वर ही अनेकां कडून जोरदार टीका करण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय थोडे मावळे तयार करून स्वराज्याची स्थापना केली होती.अगदी त्याच गनिमी काव्याने आपल्याला ही निवडणूक लढवावी लागणार आहे.हत्ती होउन लाकड फोडण्या पेक्षा मुंगी होऊन साखर खावी लागणार आहे.संदिप दिघोळकर, रिपब्लिकन पक्षाचे सतिश क्षेत्रे,रेणुका वाडीचे उपसरपंच अरुण पाटील झाडे,कडगावचे शिवसेनेचे नेते दत्तू पाटील कोरडे,सातवडचे राजेंद्र पाठक, राहुरीचे बाळासाहेब जर्हाड,नाथा चव्हाण,रघुनाथ झीने,शिवशंकर राजळे,संपत म्हस्के, नंदराज कुटे यांनी आपले विचार व्यक्त केले.शशिकांत गाडे सर म्हणाले की नगर तालुक्यातून आपण मागे पडलो तर राजकारण सोडून देऊ.आपल्याला भाग्यश्रीला दिलेल्या त्रासाचा बदला घ्यायचा आहे.त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या भाग्यश्री मोकाटे यांचे अश्रू अनावर झाले होते.यावेळी उपस्थित असलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना निवडणूक लढविण्यासाठी आर्थिक मदत दिली.शरदचंद्र पवार साहेब यांनी माझ्या वर जो विश्वास दाखवला आहे त्याला कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ देणार नाही असा विश्वास उमेदवार गोविंद मोकाटे यांनी व्यक्त केला.कामत शिंगवे येथिल उद्धव दुसंग यांनी सुत्र संचालन केले.त्यानंतर घाटशिरस, शिरापूर,तिसगाव येथे जाऊन प्रचार करत व्यावसायिक वर्गाच्या गाठी भेटी घेतल्या.नगर तालुक्यातील अनेक ठिकाणचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते मोठ्या उमेदीने कामाला लागले आहेत.

Don`t copy text!