पाचोरा येथील जेष्ठ कवी पांडुरंग सुतार “कविवर्य कुसुमाग्रज” पुरस्काराने सन्मानित

पाचोरा येथील जेष्ठ कवी पांडुरंग सुतार “कविवर्य कुसुमाग्रज” पुरस्काराने सन्मानित

 

काव्य क्षेत्रातील सर्वोत्तम पुरस्कार

 

पाचोरा (प्रतिनिधी)

 

पाचोरा तालुक्याच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला आहे. डोंगरगाव येथील रहिवासी व सध्या पाचोरा येथे राहत असलेले जेष्ठ कवी पांडुरंग सुतार यांना, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्यातर्फे २०२३ या वर्षाचा “कविवर्य कुसुमाग्रज” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

पांडुरंग सुतार यांच्या ” ते लोक कोण आहेत ” या काव्य संग्रहासाठी पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांना गौरविण्यात आले. २०२३ या वर्षाचा काव्य क्षेत्रातील हा सर्वोत्तम मानला जातो. तसेच लोकमत तर्फे देण्यात येणारा लोकमत साहित्य पुरस्कार देखील त्यांच्या  ” ते कोण लोक आहेत ”  या संग्रहाला मिळाला आहे. पांडुरंग सुतार हे अनेक वर्षापासून कविता लिहित असून, त्यांचे अनेक लेख आणि कविता मौज, हंस, युगवाणी, मुक्तशब्द, शब्दवेध, वाघूर या सारख्या दर्जेदार दिवाळी अंकातून आणि नियतकालीकातून प्रकाशित झाल्या आहेत. आकाशवाणी आणि वृत्तपत्रातही त्यांच्या कविता प्रसारित व प्रकाशित झाल्या आहेत. त्यांचे आता पर्यंत तीन कविता-संग्रह प्रकाशित झालेली आहेत.

कवियत्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव च्या प्रथम वर्ष कला(मराठी) अभ्यासक्रमासाठी त्यांच्या ६ कवितांचा समावेश करण्यात आला होता.

खान्देशातील डोंगरगांव सारख्या ग्रामीण भागातून आलेल्या जेष्ठ कवी पांडुरंग सुतार यांच्या कविता-संग्रहाला हे मानाचे पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. रोटरी क्लब ऑफ पाचोरा, अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा पाचोरा, साहित्यप्रेमी वर्ग, पाचोरा डॉक्टर्स असोसिएशन, पाचोरा जुंटो क्लब आणि पाचोरा रिडर्स ग्रुप यांच्याकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या व अभिनंदन करण्यात आले.