कै.वसंतराव कोळगे यांच्या स्मरणार्थ संजय कोळगे यांच्या संतपुजनाने आणि ह.भ.प. उमेश महाराज दशरथे यांच्या काल्याच्या किर्तनाने आव्हाणे येथील हरीनाम सप्ताहाची सांगता

कै.वसंतराव कोळगे यांच्या स्मरणार्थ संजय कोळगे यांच्या संतपुजनाने आणि ह.भ.प. उमेश महाराज दशरथे यांच्या काल्याच्या किर्तनाने आव्हाणे येथील हरीनाम सप्ताहाची सांगता

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) कै.वसंतराव कोळगे यांच्या स्मरणार्थ संजय कोळगे यांच्या संतपुजनाने आणि आळंदीचे ह.भ.प.उमेश महाराज दशरथे यांच्या काल्याच्या किर्तनाने अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील आव्हाणे बुद्रुक येथील अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता झाली.दिनांक २८/४ते ५/५/२०२५ या काळात या अखंड हरिनाम सप्ताहात गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.सर्व ह.भ.प.अण्णासाहेब बोरुडे, प्रेमानंद शास्त्री, उल्हास सुर्यवंशी,आरती ताई शिंदे, निलेश वाणी, गोरक्षनाथ बनकर, अम्रुतानंद सरस्वती, यांनी किर्तने झाली. पारायण काळात गावातील अनेक घरातील भाविकांनी अन्नदान केले.भगवान चोथे, रावसाहेब पंडित, मामा पंडीत, प्रविण पाटेकर यांच्या महाप्रसादाच्या पंगतीने या सोहळ्याची सांगता झाली.ह.भ.प. उमेश महाराज दशरथे यांनी अनेक दाखले देत उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.गावातील भजनी मंडळासह असंख्य भाविक भक्त या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.