भिंत अंगावर पडून मृत पावलेल्या महिलेच्या वारसाला ४ लाखांच धनादेशाचे वाटप आ.किशोर पाटील यांनी तीन आठवड्यात करुण दिली मदत

भिंत अंगावर पडून मृत पावलेल्या महिलेच्या वारसाला ४ लाखांच्या धनादेशाचे वाटप
अवघ्या तीन आठवड्यात मदत आ.किशोर अप्पा पाटील यांच्या प्रयत्नांना यश

सततच्या पावसामुळे भिंत अंगावर पडल्यामुळे गेल्या ७ सप्टेंबर २०२१ रोजी मृत्युमुखी पडलेल्या पाचोरा शहरातील हनुमान नगर भागातील महिला सुमनबाई यादव माळवे वय ६५ यांचे वारस असलेल्या विवाहित मुलगी यमुना दीपक शिरसाळे यांना शासनाच्या नैसर्गीक आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत मयत व्यक्तीच्या वारसांना देण्यात येणाऱ्या आर्थिक साहाय्यातुन चार लाख रुपयांच्या शासकीय मदतीचा धनादेशाचे वाटप करण्यात आले.अवघ्या तीन आठवड्यात बाधित कुटुंबाला मदत मिळाल्याचे समाधान कुटुंबियांच्या चेहऱ्यावर दिसत होते.
तहसील कार्यालयात मंगळवारी दुपारी १२ वाजता झालेल्या या कार्यक्रमात नगराध्यक्ष संजय गोहिल, प्रवीण ब्राह्मणे,निवासी नायब तहसीलदार संभाजी पाटील, शहर तलाठी आर डी पाटील, लिपिक अमोल भोई, हिरामण भोसले यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले.दरम्यान शासन सर्व प्रकारच्या नैसर्गीक आपत्तीत जनतेच्या पाठीशी असून काही दुर्दवी घटना घडल्यास जनतेने तात्काळ प्रशासनाला संपर्क करण्याचे आवाहन नगराध्यक्ष संजय गोहिल यांनी केले.
संततधार पावसामुळे सुमनबाई यांच्या घराची भिंत कोसळल्याने त्यांचा दुर्दवी मृत्यू ओढवला होता.याबाबतची महिती मिळताच आ.किशोर अप्पा पाटील यांनी तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश देऊन मदतीसाठीचा प्रस्ताव शासनदरबारी सादर करण्याचा सूचना प्रशासनास दिल्या होत्या त्या अंतर्गत महसूल प्रशासनाने देखील तत्परता दाखवत तात्काळ प्रस्ताव सादर केल्याने अवघ्या तीनच आठवड्यात शासकीय मदत मिळाली.यासाठी तहसीलदार कैलास चावडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार संभाजी पाटील, शहर तलाठी आर डी पाटील लिपीक अमोल भोई यांनी विशेष परिश्रम घेतले