पहूर येथील किराणा दुकान फोडीत 1 संशयित आरोपीस अटक

पहूर येथील किराणा दुकान फोडीत 1 संशयित आरोपीस अटक. आरोपी कडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पुढील तपास करण्यासाठी 3 दिवसाची पोलिस कोठडी.परिसरातील इतर चोरीच्या घटना उलगडण्याची शक्यता.

पहूर (प्रतिनिधी)

काल दिनांक 28 सप्टेंबर 2021 वार मंगळवार रोजी पहूर बस स्थानक परिसरातील कृषी पंडित कॉम्प्लेक्स मधील स्वामी समर्थ दुकानातून रोकड सह किराणा सामान चोरीला गेला होता.

सदर घटनेचा पहूर पोलिस यांनी पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत असताना गुप्त बातमी द्वारा माहिती घेत पो.हे. कॉ. ईश्वर देशमुख, ज्ञानेश्वर ढाकरे, कुमावत यांनी संशयित आरोपी रोहित दिपक थोरात वय 22 याला बस स्थानक परिसरात अटक केली असता त्याच्या जवळ रोकड मिळून आली आहे.

सदरील आरोपीला जामनेर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या चोरीचा तपास पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.काँ. प्रकाश पाटील हे करीत आहे.