आषाढी एकादशीच्या निमित्तानं न्यू इंग्लिश मेडियम स्कूल,कोळगाव,येथे शोभायात्रा संपन्न

आषाढी एकादशीच्या निमित्तानं न्यू इंग्लिश मेडियम स्कूल,कोळगाव,येथे शोभायात्रा संपन्न….!!!!

 

कोळगाव ता.भडगाव (प्रतिनिधी) – कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत,न्यू इंग्लिश मेडियम स्कूल,कोळगाव ता.भडगाव येथे आषाढी एकादशीच्या निमित्तानं कोळगाव नगरीत पायी दिंडी काढत शोभायात्रा काढण्यात आली.

विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विठ्ठल-रुख्मिणी तसेच वारकऱ्यांचा वेशात मोठ्या उत्साहात आपला सहभाग नोंदवला,यावेळी पालखी सुध्दा सजविण्यात येऊन संपूर्ण गावात पायी दिंडी काढत,विठ्ठल-रुख्मिणीचा जयघोष करीत,मस्तकावर तुळसी घेत,संत तुकारामांचे अभंग,संत एकनाथांचे भारुड,संत ज्ञानदेवांचे अभंग इ.गायन करीत टाळ मृदंगाच्या निनादात शोभायात्रा काढण्यात आली.

यावेळी प्राचार्य पुजा पाटील,दिपिका पाटील,पुनम महाजन,निकीता पाटील,तेजस्विनी पाटील,मयुरी पाटील,पुनम देसले,जनाबाई महाजन आदि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.