जळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे नागरिकांना आवाहन

जळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे नागरिकांना आवाहन

जळगाव, दि. 4 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणांतर्गत सर्व तालुका विधी सेवा समित्यांमार्फत न्यायालयीन कामकाजाकरीता सरकारी खर्चाने पॅनेलवरील वकील नियुक्त केले जातात. नियुक्त केलेल्या वकिलांना नियमाप्रमाणे मानधन देण्यात येते. तसेच त्यांना टायपिंग, ड्राफ्टिंग, स्टॅम्पिंग, झेरॉक्ससह किरकोळ कागदपत्रांसाठी कार्यालयामार्फत खर्च दिला जातो. सदरच्या कामांकरीता कोणी पैश्यांची मागणी केली, तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय किंवा तालुका विधी सेवा समितीकडे किंवा दूरध्वनी क्रमांक 0257- 2221474, ई- मेल आयडी : jalgaondlsa@yahoo.com, अमळनेर : 02587- 228163, भडगाव : 02596- 213004, चाळीसगाव : 02589-223044, चोपडा : 02586- 220292, एरंडोल : 02588- 244639, जामनेर : 02580- 230080, मुक्ताईनगर : 02583-234546, पाचोरा : 02596- 244390, पारोळा : 02597-292776, रावेर : 02584-250439, यावल : 02585-261369, धरणगाव : 02588- 252550, बोदवड : 02582-275200 वर संपर्क साधावा, तसेच याचा जिल्ह्यातील नागरिक व पक्षकार यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगावतर्फे करण्यात आले आहे.