एकनाथराव खडसे यांची बदनामी करणाऱ्या विरोधकांची व सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्याचा करेट कार्यक्रम आता खडसे समर्थक लावल्याशिवाय राहणार नाहीत -अनिल महाजन,ओबीसीं नेते.

एकनाथराव खडसे यांची बदनामी करणाऱ्या विरोधकांची व सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्याचा करेट कार्यक्रम आता खडसे समर्थक लावल्याशिवाय राहणार नाहीत -अनिल महाजन,ओबीसीं नेते.

गेल्या दोन दिवसापासून जळगाव जिल्ह्यात विरोधकांकडून नाथाभाऊ एकनाथराव खडसे यांची मालमत्ता जप्त झाली नोटीस आली ईडी पथक आले अशी सोशल मीडियावर बदनामी सुरू आहे. पण असा कोणताही प्रकार झाला नसल्याचे रोहिणी ताई खडसे यांनी स्पष्ट केले आहे. जे लोक सोशल मीडियावर बदनामी करत आहे .यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी व यांचा करेट कार्यक्रम लावण्याची तयारी खडसे समर्थकांनी जिल्ह्यात केली आहे. बहुजन नेतृत्वाला संपवण्याचा डाव आखणारे यांना फक्त एकनाथराव खडसेच दिसत आहे .राज्यात अनेक समस्या आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या यांना दिसत नाही पावसाने कहर केला आहे. अतिवृष्टी सुरू आहे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. महापूर आल्यामुळे अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. संसार उघड्यावर आला आहे.यावर बोलायला कोणी तयार नाही.

नाहक बदनामी म्हणून बहुजनांचे नेते एकनाथराव खडसे यांची बदनामी करून अघोरी आनंद घेण्याचा प्रयत्न काही लोक करत आहे. अशा लोकांवर आता खडसे समर्थकांकडून गावोगावी नजर ठेवण्यात येणार आहे. आणि या लोकांचा करेट कार्यक्रम खडसे समर्थ केल्याशिवाय राहणार नाही असे अनिल महाजन ओबीसी नेते महाराष्ट्र राज्य यांनी एका पत्रकान्वये म्हटले आहे. एकनाथराव खडसे झुंजार व्यक्तिमत्त्व आहे शोषित-पीडित- वंचितांचा आवाज आहे. यांचा आवाज कोणी दाबु शकत नाही आणि सर्वात महत्वाचे नाथाभाऊ यांनी कुठलेही चुकीचे काम केलेले नाही. त्यामुळे अशा अनेक किती चौकश्या झाल्या तरी त्याचा काही फरक पडणार नाही. रामाला सुद्धा वनवासात १४ वर्षे काढावी लागली. राजकारणात हा हुकमी एक्का नाथाभाऊ खडसे लवकरच राजकारणात व मंत्रिमंडळ मध्ये सक्रिय दिसतील यात काही शंका नाही.

पण आता हे नक्की आहे नाथाभाऊ यांची सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्या विरोधकांचा आता करेट कार्यक्रम लागणार आहे हे नक्की जिल्ह्यात खडसे समर्थक यांची लीगल टीम व सोशल मिडिया टीम लक्ष ठेऊन असणार आहे. नाथाभाऊ यांची बदनामी करून आघोरी आनंद घेणार्यांना आता खडसे समर्थक जसे तसे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. असे ओबीसी नेते अनिल महाजन यांनी बोलतांना सांगितले.