भेंडा कारखाना येथे यहोवाच्या साक्षीदार कडून येशुच्या मृत्यूचा स्मारक विधी मोठ्या उत्साहात साजरा
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
प्रभू येशूने जीवंत असताना आपल्या मृत्यूच्या अगोदरच हा स्मारक विधी साजरा केला होता.त्यामुळे भविष्यात सर्व मानव जातीला याच पृथ्वीवर अनंतकाळ जगण्याची आशा मिळाली.त्या काळात येशुने हा स्मारक विधी साजरा करताना ज्या प्रतिकांचा उपयोग केला होता अगदी त्याच प्रमाणे या ही कार्यक्रमात भाकर आणि द्राक्ष रस याचा वापर करण्यात आला.प्रारंभी एका प्रार्थना गीताने या कार्यक्रमाची सुरूवात झाली.नंतर देवदान हिवाळे यांनी प्रास्ताविकात या कार्यक्रमाची रूपरेषा उपस्थितांना समजावून सांगितली. जोयेल नागावकर यांनी “देवाने आपल्या साठी कशा प्रकारे खंडणी ( बलिदान) देऊन कार्य केले त्याची कदर बाळगा”या विषयावर चांगला संदेश प्रसारित केला.त्या नंतर तेथे ठेवण्यात आलेली प्रतीके ही तेथील बांधवांनी उपस्थित असलेल्या पाहुण्यामध्ये फिरवली.सर्वांनी ती प्रतिके आपल्या हातात घेऊन येशुने दिलेल्या खंडणी बलिदाना बद्दल आपला आदर व्यक्त केला.या कार्यक्रमात ठेवण्यात आलेली प्रतिके ही नेमकी कोणी सेवन करायची या बद्दल बायबल मधिल काही वचनांचा आधार घेऊन असे विशद केले गेले की स्वर्गीय जिवनाची आशा असलेल्या छोट्या कळपातील १,४४,००० लोकांनीच ती प्रतिके सेवन करायची असं सांगितले गेले.हा कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी अशोक सुर्यवंशी, आदित्य खरात, आदेश खरात, संदिप गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले.या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील अनेक गावांतील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.























