संत सेवालाल महाराज जयंती निमित्त बंजारा समाज बांधवांना आ.किशोर पाटील यांचेकडून कोट्यवधींच्या विकास कामांची भेट

संत सेवालाल महाराज जयंती निमित्त बंजारा समाज बांधवांना आ.किशोरअप्पा पाटील यांचेकडून कोट्यवधींच्या विकास कामांची भेट

पाचोरा(वार्ताहर) दि,१५
विधानसभेच्या पाचोरा भडगाव मतदार संघात असलेल्या सुमारे वीस बंजारा तांडे वाडे वस्त्यांच्या मूलभूत विकासासाठी कोट्यवधी रुपयांच्या विकास कामे मंजूर करून त्यांचे भूमिपूजन संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त बंजारा समाज बांधवांना अनोखी भेट दिली आहे.
त्याअंतर्गत मंगळवारी पाचोरा तालुक्यातील मोहाडी, आंबेवडगाव तांडा नंबर एक व दोन ,जोगें ,कोकडी, वरसाडे तांडा व सातगाव तांड्यात विविध विकास कामांच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला .मोहाडी येथे शासनाच्या ग्रामीण विकास योजने अंतर्गत मूलभूत सुविधा योजना २५/१५ अंतर्गत येथे पेव्हर ब्लॉक बसवणेकामी १० लाख ,रस्ता काँक्रीटीकरणासाठी १० लाख,जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेतुन मंजूर झालेल्या १ कोटी १७ लाख रुपयांची पाणी पुरवठा योजनेचे भूमीपुजन करण्यात आले.यावेळी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील, तालुका प्रमुख सुनील पाटील, बाजार समितीचे माजी संचालक शिवदास पाटील,जि प चे माजी सभापती विकास पाटील, शहर प्रमुख प्रवीण ब्राह्मणे, हेमराज पाटील, विनोद पाटील,योगेश जाधव, सरपंच-ज्योति पाटिल, उपसरपंच-लोटन महाजन,नयनसिंग पाटिल, मानसिंग जाधव, ताराचंद पवार, भगवान जाधव, दयाराम पाटिल,राजेसिंग जाधव, सदू जाधव,किसन जाधव छगन जाधव यांचे सह ग्रामस्थ उपस्थित होते.
आबेवडगाव तांडा नंबर एक व दोन मध्ये दहा दहा लाख रुपयांचे रस्ता काँक्रीटीकरण,दोन लाख रुपयांचे व्यायाम साहित्य आदी मंजूर करत त्याचे भूमीपूजन केले.
यावेळी सरपंच वसंत पवार , माजी सरपंच,उत्तम राठोड,राजू राठोड, शिवलाल चव्हान धर्मा राठोड, सचिन पवार, प्यारे पवार, संजय पाटील, अमोल पाटील, अनिल पवार,धनंजय राठोड, विजय राठोड,पावन पवार,डॉ श्याम पाटील, बाळू चंद्र,यांची उपस्थिती होती.
जोगे तांडा येथे पाणी पुरवठा योजना १ कोटी सहा लाख ,अंगणवाडी बांधकामासाठी १० लाख ,रस्ते काँक्रीटीकरणासाठी १० लाख रुपयांची निधी मंजूर केला
तर ५० लाख रुपये नवीन रास्ता कामासाठी मंजुरीच्या प्रतीक्षेत असून एकूण सुमारे २ कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी गुलाब राठोड, काशिनाथ राठोड, रामसिंग चव्हाण, हिरसिंग सुरा, नामदेव भावडू, प्रथमेश पाटील,ज्ञानदास राठोड, दत्ता बोरसे, प्रताप राठोड यांची उपस्थिती होती.
वरसाडे तांडा येथे जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे दीड कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना ,१५ लाख रुपयांची व्यायाम शाळा इमारत व दोन लाखाचे साहित्य, १५ लाख रुपयांचे सभा मंडप तसेच दहा लाखाचे रस्ता काँक्रीटीकरण कामाचे भूमीपुजन करण्यात आले.तर कोकडी तांडा येथे सुमारे १ कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजनेचे भूमीपूजन करण्यात आले.कोकडी तांड्यात पाणी पुरवठा योजना व रस्ता काँक्रीटीकरण कामांचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच सातगाव तांड्यात देखील रस्ते कामासह समाज मंडपाच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले.गाव ताड्यांना जोडणारे रस्ते, अंतर्गत काँक्रीटीकरण, पाणी पुरवठा योजना या कामांना आपले प्राधान्य असल्याचे यावेळी आमदार किशोर अप्पा पाटील यांनी सांगितले.