‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियान अंतर्गत श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथे आरोग्य विषयावर मार्गदर्शन

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियान अंतर्गत श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथे आरोग्य विषयावर मार्गदर्शन

पाचोरा (प्रतिनिधी)
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से .हायस्कूल पाचोरा येथे’मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’या अभियान अंतर्गत आरोग्य विषयांतर्गत बदलत्या जीवनशैलीमुळे लहान वयात येणारा लठ्ठपणा व त्याची कारणे व त्यावरील उपाय यासंबंधी मार्गदर्शन संस्थेचे जेष्ठ संचालक जनरल फिजिशियन डॉ. जयवंतराव पाटील यांनी केले. व मधुमेह व डोळ्यांचे विकार यासारख्या आजारांची माहिती व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय यावर मार्गदर्शन नेत्र विकार तज्ञ डॉ. सुनील पाटील यांनी केले. विद्यार्थ्यांच्या वाढत्या आरोग्य समस्या व त्यावरील उपाय या समस्यांवर त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात उपमुख्याध्यापक नरेंद्र पाटील यांनी आरोग्य विषयावर डॉक्टरांनी सांगितलेले उपाय आमचे विद्यार्थी योग्यपणे करतील याची आश्वासन दिले या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका प्रमिला वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याध्यापक नरेंद्र पाटील, पर्यवेक्षिका अंजली गोहिल, प्रितंमसिंग पाटील, प्रतिभा पाटील, रवींद्र बोरसे ,सागर पाटील. उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री पाटील व संगीता लासुरकर यांनी केले. विद्यार्थ्यांच्या समस्या आरोग्य विषयी मार्गदर्शन केले तर आभार प्रदर्शन विजय पाटील यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.