मतदार यादी पडताळणी शिबिरासाठी नागरिकांना जाहीर आवाहन
पाचोरा (प्रतिनिधी) – प्रभाग क्रमांक १४ तसेच कृष्णापुरी परिसरातील नागरिकांसाठी मतदार यादी पडताळणीसंदर्भात महत्त्वाचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या मताधिकाराची नोंद अचूक राहावी यासाठी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
उद्या, दिनांक १ एप्रिल २०२६ (बुधवार) रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १२.०० या वेळेत मारोती मंदिर, कृष्णापुरी, पाचोरा येथे मतदार यादी पडताळणी शिबिर होणार आहे. या शिबिरात संबंधित विभागातील सर्व बीएलओ (Booth Level Officers) उपस्थित राहणार असून नागरिकांच्या नोंदी तपासून आवश्यक दुरुस्त्या व मार्गदर्शन केले जाणार आहे.
विशेषतः ज्या नागरिकांची नावे २००२ च्या मतदार यादीत होती, परंतु २०२४ च्या अद्ययावत मतदार यादीत त्यांची नावे अद्याप मॅप झालेली नाहीत, त्यांनी या शिबिरात उपस्थित राहून आपली नोंद पूर्ण करून घ्यावी. यामुळे भविष्यात मतदानाच्या वेळी कोणतीही अडचण येणार नाही.
नगरसेवक प्रदीप भगवान वाघ व नगरसेविका सुरेखा अशोक पाटील यांनी सर्व नागरिकांना वेळेत उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत असणे अत्यंत महत्त्वाचे असून, लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभागासाठी ही प्रक्रिया आवश्यक आहे.
सदर शिबिरामुळे मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत होण्यास मदत होणार असून नागरिकांनी सहकार्य करावे, असेही त्यांनी नमूद केले आहे.























