कॉ.ए.बी.बर्धन यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन

कॉ.ए.बी.बर्धन यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन

महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर वीज, कोळसा, विमा, तसेच शोषित,वंचित पीडीत वर्गाचे प्रतिनिधित्व करत आयुष्यभर संघर्षरत राहून व्रतस्थ जीवन जगलेले माननीय कॉ.ए.बी.बर्धन उर्फ भाई बर्धन यांच्या जयंतीनिमित्त आज संघटनेचे जळगाव परिमंडळ शाखेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.संघटनेचे जळगाव विभाग मध्ये बदली प्रक्रिया राबविण्यात आली त्यामध्ये अनियमितता झाली आहे त्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलन च्या मंडपात प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले
कॉ.ए.बी.बर्धन यांच्या जीवनचरित्रावर कॉ.विरेंद्रसिंग पाटील परिमंडळ सचिव जळगाव तथा राज्य संयुक्त सचिव यांनी अत्यंत उद्बोधक असे मनोगत व्यक्त केले.भाई बर्धन यांच्या जन्मभूमी नागपूर व सुरूवात कर्मभूमी नागपूर आणि त्या नंतर* *कामगार चळवळ,सामाजिक,राजकीय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दिलेलं अतुलनीय योगदानाबद्दल समस्त वीज कर्मचारी आजन्म ऋणी राहतील याची जाणीव करून दिली.
सदर प्रसंगी संघटनेचे माजी सर्कल अध्यक्ष कॉ.भगवान सपकाळे,मंडळ सचिव कॉ.दिनेश बडगुजर, विभागीय सचिव कॉ.किशोर जगताप, विभागीय सहसचिव कॉ.सागर पाथरवट, कॉ.दीपक बडगुजर, कॉ.मुकेश बारी,कॉ.असलम मण्यार रावेर, कॉ.शरद बारी,कॉ.सचिन फड, कॉ.गिरीष बर्हाटे,कॉ.मंगेश बोरसे, कॉ.रविंद्र सपकाळे,कॉ.रविंद्र धनगर, कॉ.सुनिल गवळे,कॉ.किशोर सपकाळे कॉ.विजय टोकरे,कॉ.दिलीप बाविस्कर,कॉ.संदीप तायडे, सभासद पदाधिकारी उपस्थित होते
कॉ.गिरीष बर्हाटे विभागीय प्रसिद्धी प्रमुख महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन जळगाव.