नांद्रा येथील तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या फार्म हाऊस वर भुरट्या चोरट्यांचा डल्ला

नांद्रा येथील तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या फार्महाऊसवर भुरट्या चोरांचा हैदोस

नांद्रा ता. पाचोरा येथे व परिसरात उन्हाळा सुरू झाल्यापासून गुरंढोरं चोरीपासून तर चंदनाचे झाड चोरणे,पाण्याची मोटार चोरणे,रस्त्यालगत असणारे कोल्ड्रिंक्स दुकान फोडणे, गावालगत घरातून घरात घुसून एलईडी टीव्ही चोरणे व आता तर चक्क तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष त्रंबक बाविस्कर यांच्या गावा लागतील पाहन रस्त्यावरील फार्महाउस वरून शेतातील शेती अवजार, पाण्याचे पीटर मशीन व इतर शेती अवजार यामध्ये लोखंडे कोळपे,वखर, नागरटी चे इतर लोखंडी साहित्य साहित्य,घन कुलूप तोडून चोरण्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली असून या भुरट्या चोरांचा बंदोबस्त कधी होणार असे ग्रामस्थांमधून विचारणा होत आहे याबरोबरच गावोगावी ग्रामसुरक्षा दल स्थापन होऊनही ते कार्यान्वित कधी होणार पोलिस विभागाकडून त्यांना ओळखपत्र देऊन त्यांच्या जबाबदाऱ्या सांगण्यासाठी मार्गदर्शन कधी होणार? याविषयी जनतेमधून विचारणा होत असून लोक व शेतकरी वर्ग पशुपालक हे भयभीत झाले आहेत. पाचोरा जळगाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 विस्तीर्ण झाल्यापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक होत असते यामध्येच रस्त्यालगत असलेल्या अनेक घरांमधून या भुरट्या चोरांनी या अगोदरही डल्ला मारला आहे यामध्ये काही दिवसापूर्वी गुलाब बाविस्कर याच्या घराजवळून गाय व वासरू दोर कापून नेले सुरेश श्यामराव सूर्यवंशी यांची पेट्रोल पंप जवळील कोल्ड्रिंक्स टपरी तीन वेळा फोडली, त्याच्या विरुद्ध बाजूस असलेल्या समाधान रेस्टॉरंट वाल्यांचे दोन बोकड चोरले, सुरेश शामराव यांची पाण्याची मोटर चोरली,गावालगत असलेले बालू बाविस्कर यांचे घरातील रात्री दरवाजा उघडा असल्याने ते वसरीत गाढ झोपेत असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नात आलेली 43 इंच एलईडी टीव्ही रिमोट घरात घुसून लांबवले व आता खुद्द गावातील तंटे सोडणारे व वाद मिटवणारे नांद्रा येथील तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष बाविस्कर यांचे पहान रोड लगत असलेल्या शेतात कुलूप तोडून फार्महाउस वरून पाण्याचे पिटर मशीन वखर,कोळपे,विले, खुरपे कुराड घन असे शेतात लागणारे सर्व लोखंडी अवजारे चोरट्यांनी लंपास केले आहेत याबरोबरच यापूर्वीही कुरंगी येथूनही अशाच प्रकार बाबादेव जवळून गाई चोराच्या घटना घडलेल्या आहेत तरी या भुरट्या चोरांना साठी प्रत्येक गावात ग्रामसुरक्षा दल स्थापन होणे व कार्यान्वित होणे गरजेचे असून पोलिसांनीही रात्रीची गस्त घालने आवश्यक आहे व त्या संदर्भात पोलिस पाटील यांच्या मीटिंग घेऊन प्रत्येक गावात ग्रामसुरक्षा दल ओळखपत्र वाटप करून ते कार्यान्वित करणे अत्यंत गरजेचे आहे