Home महाराष्ट्र तिसगाव येथे जैनांचे २४ वे तिर्थंकर वर्धमान महावीर जयंती महोत्सव सोहळा मोठ्या...

तिसगाव येथे जैनांचे २४ वे तिर्थंकर वर्धमान महावीर जयंती महोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

तिसगाव येथे जैनांचे २४ वे तिर्थंकर वर्धमान महावीर जयंती महोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

 

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

जैन धर्मातील २४ वे तिर्थंकर वर्धमान महावीर यांचा जयंती महोत्सव सोहळा अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.तिसगाव येथील वृद्धेश्वर हायस्कूल चौकातून भगवान महावीरांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती.या मिरवणूकीत सर्व जाती धर्मातील भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मिरवणुकी तील सर्व अबाल वृध्द आणि माता भगिनींना सुबेच्छा देण्यासाठी शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या हॅट्ट्रिक आमदार मोनिकाताई राजळे यांनी वाटेत थांबून सर्वांचे स्वागत केले आणि उपस्थित महीलांना सुबेच्छा दिल्या.सदर मिरवणूक ही पाथर्डी रस्त्यावरील आशिर्वाद मंगल कार्यालयात येऊन थांबली.तेथे गावातील सर्व जाती धर्मातील जेष्ठ नेते यांच्या हस्ते भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. डॉ.ऋषिकेश कुलकर्णी यांनी भगवान महावीर यांच्या जीवन चरीत्रावर संदेश दिला.यावेळी पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती आणि जेष्ठ नेते काशिनाथ पाटील लवांडे,दादा महाराज नगरकर, शिवशंकर राजळे, काशिनाथ पाटील राजळे,प्रकाशबुवा रामदासी, इलियास शेख सर,भाऊसाहेब लोखंडे,शंकरराव उंडाळे,सदाशिव मैड,काशिनाथ ससाणे,भारत गारूडकर,सुनिल शेठ शिंगवी, संतोष छाजेड, पिंटू परमार, ॲडव्होकेट वैभवराव आंधळे, राजूकाका फिरोदिया, दिलिप गांधी, अशोक बोरा,अभय मुथ्था,संजय लोढा,प्रेमसुख कटारीया, माणिकचंद लोढा, सतिश मुथ्था, रमेश मुनोत, सुधिरशेठ शिंगवी,पुरुषोत्तम आठरे,कुशल भापसे,सुनिल परदेशी,जेष्ठ नेते पोपटराव आंधळे, आणि माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सुत्रसंचालन रफीक शेख यांनी केले.शेवटी उपस्थितांना प्रीती भोजन देऊन या सोहळ्याची सांगता झाली.

Don`t copy text!