
जिल्हा उपाध्यक्ष पदी श्री विठ्ठल महाजन माऊली तसेच पाचोरा तालुकाध्यक्ष पदी श्री प्रदीप माळी साहेब यांची नियुक्ती करण्यात आली
पाचोराः महात्मा फुले ब्रिगेड सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्ष पदी शाहिर विठ्ठल एकनाथ महाजन माऊली तसेच पाचोरा तालुकाध्यक्ष पदी भाऊसाहेब प्रदीप आसाराम माळी यांची निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री स्वप्नील चंद्रशेखर बोबडे साहेब प्रदेश अध्यक्ष आबासाहेब भास्करराव महाजन पारोळा जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश महाजन जळगाव यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली
पुढे शाहिर विठ्ठल एकनाथ महाजन माऊली म्हणाले समाजाच्या आर्थिक शैक्षणिक सामाजिक व राजकीय घडामोडी प्राप्त होण्यासाठी समाजाचे कामकाज पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही सतत कामातून समाजाला न्याय हक्कासाठी व पाठबळ देण्यासाठी काम करत राहु तसेच संत महापुरुषांच्या विचारांची धुरा घेऊन व जयंती पुण्यतिथी तसेच सामाजिक उपक्रम राष्ट्रीय देशभक्ती पर उपक्रम साजरा करत राहणार संघटनेच्या माध्यमातून समाजाचे अनेक विषय मार्गी लावण्यासाठी संघटना प्रयत्नशील राहणार ही संघटना पुढे घेऊन जाण्यासाठी व समाजाला नविन चैतन्य निर्माण होण्यासाठी महात्मा फुले ब्रिगेड सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य ही संघटना समाज हीताचेच विचार पुढे घेऊन जाण्यासाठी स्थापन झालेली आहे या निवडीचे सर्व समाजातून अभिनंदनाचा वर्षाव सर्वत्र कौतुक होत आहे
























