पाचोरा कृष्णापुरी हिवरा नदीचा पुलाचा काम करून नागरिकांचा प्रश्न सोडवला आ. किशोर आप्पा पाटील यांच्या मूळे नागरिकांना दिलासा

पाचोरा कृष्णापुरी हिवरा नदीचा पुलाचा लवकर काम करून नागरिकांचा प्रश्न सोडवला पाचोरा-भडगांव मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी नागरिकांना दिलासा देऊन शहराला मोकळा श्वास दिला

(  )

पाचोरा येथील कृष्णा पुरी भागातील हिवरा नदीवरील पुल हा बऱ्याच वर्षापासून जुना होता त्याची उंची सुद्धा कमी असल्यामुळे पावसाळ्यात पुलावरून पाणी जात असल्यामुळे रहदारीचा रस्ता बंद होत होता त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होते कृष्णापुरी भागातील, सिंधी कॉलनी भागातील रहिवाशांचे दवाखान्यात, सरकारी कामात, नगरपालिका तसेच बँका येण्यासाठी त्यांना बाहेरून फिरून यावा लागत होते त्यामुळे *_हा प्रश्न सोडविण्यासाठी पाचोरा तालुक्याचे आमदार श्री किशोर आप्पा पाटील यांनी माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याकडे प्रस्तावित हा पूल त्वरित मंजूर केला त्यासाठी लागणारा निधी शासनाने ताबडतोब मंजूर करून या पुलाचया बांधकामाची जबाबदारी आप्पांचे विश्वासु मित्र श्री मनोज शांताराम पाटील (MSP Buildcon Pvt Ltd) यांना देण्यात आले त्यांनी कमी वेळात कमी दिवसात उत्कृष्ट पद्धतीचे सुंदर आकर्षित दिसणारा कुठलीही तडजोड न करता एकच नंबर क्वालिटी चे काम करून झगमगाट दिसणारा असा मजबूत असणारा पुल तयार केला_* कालपासून जळगाव जिल्ह्यात जोरदार पाऊस येत असल्यामुळे सर्वच नद्या बंधारे तुडुंब भरल्यामुळे नद्या जोरात होऊ लागल्यामुळे हिवरा नदीला प्रचंड पूर आला पण यावेळेस पुलाचे काम झाले असल्यामुळे व त्यांची उंची वाढवल्यामुळे पुलाच्या खालून पाणी वाहत होते त्यामुळे कृष्णा पुरी भागातील रहिवासी सिंधी कॉलनी भागातील रहिवासी या नागरिकांचा येण्याचा मार्ग मोकळा झाल्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला आज रोजी या पुलाची पाहणी करताना पाचोरा नगरपालिका मुख्याधिकारी सौ शोभा बाविस्कर मॅडम व या पुलाचे उत्कृष्ट पद्धतीने बांधकाम करणारे नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करून देणारे ठेकेदार श्री मनोज शांताराम पाटील व त्यांच्यासोबत नगरपालिका इंजिनियर व इतर कर्मचारी उपस्थित होते.