संभाजीनगर येथील महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या पॅनेलवर कायदेशीर सल्लागार म्हणून ॲडव्होकेट असिफ लतिफ शेख यांची निवड झाल्याबद्दल अहिल्यानगर जिल्हा बार असोसिएशन आणि पाथर्डी तालुका बार असोसिएशनच्या वतीने सन्मान सोहळा संपन्न

संभाजीनगर येथील महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या पॅनेलवर कायदेशीर सल्लागार म्हणून ॲडव्होकेट असिफ लतिफ शेख यांची निवड झाल्याबद्दल अहिल्यानगर जिल्हा बार असोसिएशन आणि पाथर्डी तालुका बार असोसिएशनच्या वतीने सन्मान सोहळा संपन्न

 

 

 

 

 

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) संभाजीनगर (औरंगाबाद) येथील महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या पॅनेलवर कायदेशीर सल्लागार म्हणून ॲडव्होकेट असिफ लतिफ शेख यांची निवड झाल्याबद्दल अहिल्यानगर जिल्हा बार असोसिएशन आणि पाथर्डी तालुका बार असोसिएशनच्या वतीने ॲडव्होकेट असिफ लतिफ शेख यांचा खास गौरव करीत पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.दिनांक ७ ऑगस्ट२०२५ रोजी अहिल्यानगर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजेश कातोरे आणि ॲडव्होकेट रियाज शेख,रफिक शेख, हाफिज जहागिरदार यांनी जिल्हा न्यायालयातील सर्व वकिलांच्या वतीने अहिल्यानगर येथील सभागृहात ॲडव्होकेट शेख यांचा सत्कार केला.यावेळी जिल्हा बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. दिनांक १२ऑगष्ट २०२५ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी न्यायालयातील तालुका बार असोसिएशनच्या वतीने बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट रा.ना.खेडकर आणि पाथर्डी बारचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा संपन्न झाला.महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या माध्यमातून राज्यातील सर्व मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळांचे संरक्षण करणे हे या वक्फ बोर्डाचे मुख्य कार्य आहे. ॲडव्होकेट असिफ शेख हे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील जेष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट लतिफ इस्माईल शेख यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन यश संपादन करत वडिलांचा वकिलीचा व्यवसाय अतिशय नम्रपणे स्विकारून महाराष्ट्रात नाव उज्ज्वल केले आहे. महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या पॅनेलवर कायदेशीर सल्लागार म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यातील शेख यांच्या सह एकूण तिन व्यक्तींची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील वकिलांनी ॲडव्होकेट असिफ लतिफ शेख यांचे अभिनंदन केले आहे. विषेशत: मुस्लिम समाजातील अनेक नेत्यांनी असिफ शेख यांच्या पाठीवर विषेश कौतुकाची थाप टाकली आहे.या नवीन निवडीबद्दल पाथर्डी तालुक्यातही अनेक गावांत शेख यांचे जोरदार स्वागत होत असताना काही ठिकाणी मात्र “कही खुशी कही गम”अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.