शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून पाचोरा शहर बंद यशस्वी

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून पाचोरा शहर बंद यशस्वी

पाचोरा (प्रतिनिधी) – दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून कॉंग्रेस ने भारत बंद चे आवाहन केले होते यात पाचोरा येथे व्यापारींनी सकाळ सत्रात दुकाने बंद ठेवले

भारत बंद चा कॉंग्रेस सह इतर पक्षांच्या आवाहनाला महाराष्ट्रातुन कॉंग्रेस सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रतिसाद देत पाचोरा शहरातील व्यापारी बंधुंना बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस माजी आ. दिलीप वाघ,कॉंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अॅड अविनाश भालेराव, कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष विकास पाटील,कॉंग्रेस शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील,युवक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा संघटक उमेश एरंडे, लिगल सेल चे अध्यक्ष अविनाश सुतार, फकीरा पाटील, नाना पाटील, भुषण पाटील, गोपी पाटील, योगेश कुमावत, मनसे तालुका अध्यक्ष शुभम पाटील,सत्तार, बागवान, आदींनी केले. शहरातील व्यापारी बंधुंनी सहकार्य केले. यावेळी पो. हे. कॉ. नितीन सुर्यवंशी, पो कॉ. सुनील पाटील आदींसह कर्मचारी उपस्थितीत होते. दरम्यान बंद चे आवाहन करतांना छोटु शिंपी नामक कार्यकर्त्ता ला छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यावर अचानक त्याला चक्कर आले त्याला तात्काळ कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी सह इरफान मनियार यांनी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता ग्रामीण रुग्णालयातील डॉ. अनुपमा भावसार यांनी तात्काळ उपचार केले. डॉ. भावसार यांनी जर रुग्णालयात लवकर आणले नसते तर गंभीर अवस्था शिंपी यांची झाली अनेकदा नाटक करतो आहे म्हणून अशा पेशन्ट कडे दुर्लक्ष केले जाते हे पण चुकीचे आहे. शिंपी यांना वेळीच उपचार झाल्याने आता तब्बेत चांगले आहे