नांद्रा जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा

नांद्रा जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा
माजी सैनिकाने केले ध्वजारोहण

नांद्रा ता.पाचोरा(वार्ताहर ) येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दि.13 रोजी कोमल पाटील हिच्या हस्ते दि.14 रोजी गावातील जेष्ठ माजी सैनीक श्री. सुभाष रामकृष्ण गवादे यांच्या हस्ते दि.15 रोजी जेष्ठ नागरिक पंडीत कौतिक पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.श्री सुभाष गवादे
यांच्या कुटुंबातील श्री. रघुवीरदास गवादे,चंद्रकांत गवादे, विनायक गवादे हे बांधव माजी सैनीक आहेत.तर मुलगा सैन्यदलात कार्यरत आहे ध्वजारोहणाला व्यवस्थापन समिती अध्यक्ष स्वप्नील बाविस्कर उपाध्यक्ष,शा. व्य समिती सदस्य गणेश पाटील योगेश सूर्यवंशी, विनोद तावडे,उपसरपंच शिवाजी तावडे, सदस्य अमोल सूर्यवंशी,भाऊसाहेब बाविस्कर ,विशाल तावडे अंगणवाडी सेविका, मदतनीस ,ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या रांगोळी, चित्रकला, वक्तृत्व, वृक्षारोपण, इ. स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्यांचा बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला .सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठि शाळेच्या मुख्याध्यापिका मोहिनी पाटील,शिक्षिका प्रतिभा पाटील,स्मृती साबले,स्वाती पाटील,उर्मिला पाटील यांनी परिश्रम घेतले.