सौ.साधनाताई देशमुख राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित

सौ.साधनाताई देशमुख राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित

नांद्रा (ता.पाचोरा ) ता.17 बांबरुड(राणीचे) येथील सामाजिक कार्यकर्या सौ.साधना देशमुख यांनी केलेल्या समाज सेवेची दखल घेऊन राजमाता बहूउद्देशिय सेवाभावीषसंस्थेच्या वतीने राजमाता जिजाऊ रत्न पुरस्कार गौरवण्यात आले आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांच्या कार्याचा आदर्श घेऊन सौ.साधनाताई देशमुख यांनी समाजात निस्वार्थ पणे सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगीरीची दखल घेऊन सौ.साधनाताई देशमुख यांना राज माता जिजाऊ पुरस्काराने सन्मान पत्र देऊन गौरवण्यात आले.या सन्मान पत्रावर संस्थापक अध्यक्ष बालाजी जाधव कोषाध्यक्ष श्री .विशाल देवकते महाराष्ट्र महिला अध्यक्ष श्रीमती कल्पना काटकर यांच्या स्वाक्षने सन्मानपत्र सुपृर्त करण्यात आले.सौ.साधनाताई रविंद्र देशमुख यांना सन्मानपत्र प्राप्त झाल्या नंतर आणि ती माहिती मिळाल्याचा अनेक मान्य वरांनी व्हाटसप ,फेसबुक भ्रमन ध्वनी द्वारे शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले.