पाचोरा येथे लोक न्यायालयात 460 प्रकरणांचा निपटारा
1 कोटी 59 लाख 69 हजार 115 रुपयांची झाली वसुली..
शहर प्रतिनिधी / पाचोरा
पाचोरा न्यायालयाच्या प्रांगणात तालुका विधी सेवा समिती, पाचोरा व पाचोरा तालुका विधिज्ञ बंधू भगिनी यांच्या संयुक्त विद्यमाने १३ सप्टेंबर रोजी विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश क स्तर एस. व्ही निमसे, यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. या लोक न्यायालयात दिवाणी न्यायाधीश एस व्ही निमसे, सह दिवाणी न्यायाधीश जी. एस. बोरा यांच्या न्यायालयातील एकूण 154 इतकी प्रकरणे निकाली होवून त्यात 1 कोटी 7 लाख 50 हजार 941 रुपये इतकी वसुली झाली. तसेच वादपूर्व 306 प्रकरणांचा निपटारा होवून यात 52 लाख 18 हजार 174 रुपये इतकी रक्कम वसुल झाली आहे. एकूण 1 कोटी 59 लाख 69 हजार 115 रुपये इतकी रक्कम वसूल झाली आहे. यावेळी कौंटूंबिक वाद मधील 12 प्रकरणे निकाली निघाले. त्यापैकी एक कुटुंबामध्ये तडजोड होऊन आनंदाने नांदावयास गेले. यावेळी पॅनल प्रमुख म्हणून मा.न्यायाधीश एस.व्ही.निमसे तसेच पंच सदस्य म्हणून अँड.भाग्यश्री महाजन यांनी कामकाज पाहिले. याप्रसंगी प्रांताधिकारी भूषण अहिरे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. तसेच सदर लोक न्यायालय यशस्वी करण्याकरिता पाचोरा वकील संघाचे अध्यक्ष ॲड प्रविण पाटील, उपाध्यक्ष ॲड कविता मासरे (रायसाकडा), सचिव ॲड निलेश सुर्यवंशी ,सहसचिव ॲड कालिदास गोसावी, न्यायालयातील सर्व वरिष्ठ, कनिष्ठ विधिज्ञ, उपविभागीय अधिकारी कार्यालय कर्मचारी, तहसील कार्यालय कर्मचारी, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, बँक अधिकारी, कर्मचारी, बी. एस. एन. एल. अधिकारी, कर्मचारी, वीज महावितरण अधिकारी, कर्मचारी, पाचोरा व पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलीस स्टेशन अधिकारी, कर्मचारी तथा न्यायालयातील सहाय्यक अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, कर्मचारी यांनी सहकार्य केले. यावेळी पक्षकार आपल्या प्रकरणांमध्ये तडजोड करून घेण्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते.