समाजसेवक सुमित पंडित व सौ.पुजा पंडित यांना संत सेना महाराज समाजरत्न पुरस्कार प्रदान

समाजसेवक सुमित पंडित व सौ.पुजा पंडित यांना संत सेना महाराज समाजरत्न पुरस्कार प्रदान

सुमित पंडित हे समाज उपयोगी विविध ४२ उपक्रम राबवत तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत.

समाजरत्न गौरव पुरस्कारासाठी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या औरंगाबाद येथील सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या माणुसकी समुहाचे समाजसेवक सुमित पंडित व समाजसेविका पुजा पंडित यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत ते करीत असलेल्या रजंल्या गांजल्याची सेवा खरोखरच समाजापुढे वाखानण्या जोगी आहे,रस्तावर फिरणाऱ्या मनोरुग्णाची दाढी केस कापुन स्वच्छ अंघोळ घालुन त्यांना मनोविकृती रुग्णालयात दाखल करतात, गरजु रुग्णांना अर्धा रात्री वैद्यकीय साहित्य, भोजन, रक्त, पुरविण्यात ही जोडी देवदुतासारखी मदतीला धावुन जाते ,बेवारसांचे अंत्यविधी सुध्दा हे दापत्य माणुसकी समुहाच्या माध्यमातून करतात,पुजा पंडित सध्या वृध्दाश्रम चालवतात त्यांनी औरंगाबाद येथे माणुसकी वृध्द सेवालयात वृध्दाच्या सेवेसाठी मदतकार्य करतात ,म्हणून त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत, सन्मानित करण्यात आले. संत सेना महाराज फाँउडेशन तर्फे संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्ताने विवीध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या माण्यवरांचा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा नाशिक येथे दिनांक.२४-०८-२०२२ रोजी संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना नेते बबनराव घोलप, हे होते, दत्ता जी गायकवाड अध्यक्ष नाशिकरोड देवळाली बँक , निवृती अरिंगळे, गीता ताई गायकवाड, शेखर गायकवाड, रमेश आहेर, संजय गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.समाजसेवक सुमित पंडित यांना संत सेना महाराज समाजरत्न पुरस्कार व समाजसेविका सौ.पुजा सुमित पंडित यांना महिला समाजरत्न गौरव पुरस्कार – २०२२ हा पुरस्कार , मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.ह्या पुरस्काराचे स्वरूप शाल श्रिफळ सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र वृक्ष देऊन उपस्थित माण्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.या समाजरत्न पुरस्कारामुळे समाजात समाजसेवक सुमित पंडित व पुजा पंडित त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.सुमित पंडित यांचा हा ९० वा पुरस्कार आहे.या आधी त्यांना महाराष्ट्रातुन विविध ८९ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.तसेच पुजा पंडित यांचा हा २४ वा पुरस्कार आहे या आधी पुजा यांना २३ पुरस्काराने सन्मानित करन्यात आले आहे.या कार्यक्रमाचे आयोजक,अध्यक्ष संजय गायकवाड,उपाध्यक्ष रमेश आहेर,सचिव निलेश निकम,कार्याध्यक्ष जीवन शिंदे,सुत्र संचालन विजय देसाई ,यांनी केले.तसेच माणुसकी समुहाचे अर्जुन वेलजाळी सर,देविदास पंडित,सुमित पंडित सौ. पुजा पंडित,मिराबाई पंडित,लक्ष्मी पंडित,राम पंडित,आदी उपस्थित होते.