पाचोरेकरांसाठी वैशालीताई सुर्यवंशी यांच्यातर्फे मोफत जलसेवा टँकर पुजन करून शुभारंभ : पाणी टंचाईचे होणार निराकरण

पाचोरेकरांसाठी वैशालीताई सुर्यवंशी यांच्यातर्फे मोफत जलसेवा
टँकर पुजन करून शुभारंभ : पाणी टंचाईचे होणार निराकरण

*पाचोरा, दिनांक १० (प्रतिनिधी )* : शहरातील अनेक भागातील नागरिकांची पाण्याची समस्या लक्षात घेता शिवसेना-ुउध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्या वतीने आजपासून मोफत जलसेवा सुरू करण्यात आली आहे.

उन्हाळ्याची चाहूल लागताच पाचोरा शहरातील अनेक भागांमध्ये पाण्याची समस्या भेडसावत आहे. या अनुषंगाने नागरिकांना टँकरच्या माध्यमातून मोफत पाणी पुरवठा व्हावा या हेतूने वैशालीताई सुर्यवंशी यांनी आजपासून सेवा सुरू केली आहे. त्यांनी टँकरचे पूजन करून रवाना केले.

याप्रसंगी वैशालीताई सुर्यवंशी म्हणाल्या की, मोफत जलसेवेचे पहिले टँकर हे शहरी भागासाठी असले तरी ग्रामीण भागातील गरज लक्षात घेऊन याला खेडोपाडी देखील लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जलसेवा ही मानवतावादी सेवा असून या माध्यमातून पाण्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी मदत होणार आहे.

दरम्यान, टँकर पुजनाच्या प्रसंगी अनिल सावंत शहर प्रमुख भरत खंडेलवाल राजूभाऊ काळे आणि त्यांचे सर्व सहकारी दादाभाऊ चौधरी संदीप जैन नामदेव चौधरी खंडू मनोज चौधरी सोनवणे अशोक पाटील अभिषेक खंडेलवाल पप्पू जाधव समस्त कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.