गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल चा शिवजयंती सोहळ्यात सक्रिय सहभाग
Pachora दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवजयंती निम्मित गुरुकुल चे प्राचार्य, विद्यार्थी व शिक्षक वृंद शिवप्रतिमेचे पूजन करून मोठ्या उत्साहाने पाचोरा शिव रॅली मध्ये सक्रिय सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिव प्रतिमेचे पूजन होत असताना गुरुकुल ची विद्यार्थिनी अन्वी सानप हिला शिवाजी महाराजांचे पाळणा गीत गायनाची संधी मिळाली. त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी दिमाखदार वेशभूषेत लेझिम व लाठी काठीने सर्वांचे लक्ष वेधले. शिवरॅली ची सांगता झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य पूर्ण जीवनावर प्रकाश टाकत गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी वक्तृत्वात हि आपला सहभाग नोंदविला. सोहळ्याच्या आनंदमयी वातावरणात सन्माननीय व्यासपीठावर माननिय आमदार साहेबांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व शाळेचे प्राचार्य श्री प्रेम शामनाणी सर यांना महाराजांची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले.






















