Home महाराष्ट्र आखेगाव येथे सदगुरु जोग महाराज सेवा संस्थानच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

आखेगाव येथे सदगुरु जोग महाराज सेवा संस्थानच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

आखेगाव येथे सदगुरु जोग महाराज सेवा संस्थानच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

 

 

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

स्वानंद सुखनिवासी सदगुरु श्री जोग महाराज,वै.विठ्ठल महाराज घुले यांच्या आशीर्वादाने वै.गुरूवर्य नारायण बाबा झिंजुर्के यांच्या तपोभूमीत आखेगाव येथे २० ते२६ फेब्रुवारी या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या काळात दररोज पहाटे ४ते६ काकडा भजन,६ते७ महापुजा,साडे सात ते दहा गाथा पारायण,सकाळी ११ते१ गाथा भजन,सायंकाळी ४ते५प्रवचन,५ते ७ हरीपाठ, रात्री सव्वा आठ ते साडे दहा किर्तन सेवा आणि नंतर हरी जागर या प्रमाणे कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली आहे.सर्व ह.भ.प.विष्णू महाराज जगताप, गोविंद महाराज शिंदे,देविदास महाराज म्हस्के, कृष्णा महाराज चवरे,विठ्ठल महाराज घुले भक्ती केंद्र, ज्ञानेश्वर महाराज कुर्हाडे,यांची किर्तने होणार आहेत.बुधुवार दिनांक २५फेब्रुवारी रोजी सकाळी ग्रंथ पुजन व नंतर बाळासाहेब महाराज उखळीकर यांचे किर्तन होणार आहे. दुपारी ३ वाजता कथा सांगता,भव्य दिंडी मिरवणूक आणि नंतर विविध क्षेत्रात नैपुण्य प्राप्त केलेल्या संस्थान भक्तांचा सन्मान होणार आहे.गुरूवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ते११ ह.भ.प. कानिफनाथ महाराज खोलासे यांचे काल्याचे किर्तन होउन पुरण पोळीच्या महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता होणार आहे.गाथा पारायण नेतृत्व रवी महाराज काटे,गाथा भजन नेतृत्व सोमनाथ महाराज पोकळे, आणि संपूर्ण प्रवचन सेवा ह.भ.प.राम महाराज आखेगाव कर हे करणार आहेत.काटे, पायघन,काकडे,कापसे,भगत, तांबे,बालवे या परीवाराच्या वतीने या सप्ताहात अन्नदान करण्यात येणार आहे.तरी आखेगाव पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या सोहळ्याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन जोग महाराज संस्थानच्या संयोजकांनी केले आहे.सामुदायिक पारायण आणि पारंपरिक पद्धतीने भजन हे या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य आहे.

Don`t copy text!