पाचोर्यात संकल्प सप्ताहात शिवसेनेतुन कॉग्रेस मध्ये प्रवेश

पाचोर्यात संकल्प सप्ताहात शिवसेनेतुन कॉग्रेस मध्ये प्रवेश

पाचोरा (प्रतिनिधी) – देशात खा. राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प दिन साजरा केला मात्र पाचोरा कॉग्रेस संकल्प सप्ताह साजरा करीत असुन यात शिवसैनिकाचा कॉग्रेस प्रवेश करण्यात आला

पाचोरा कॉग्रेस ने खा. राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प सप्ताह चे आयोजन केले असून यात प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या आंदोलने सह कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी सांगितले. येथील विश्राम गृहात कॉग्रेस बैठक तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीला शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थितीत होते. यावेळी जारगांव येथील शिवसेनेचे शरीफ शेख, शंकर सोनवणे, यांचे कॉग्रेस मध्ये प्रवेशाचे सचिन सोमवंशी यांनी स्वागत केले. यावेळी शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, जेष्ठ पदाधिकारी माजी प. स. सभापती शेख शेख फकीरा, राजेंद्र महाजन, जिल्हा उपाध्यक्ष विकास वाघ, नंदकुमार सोनार, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, कृ. बा. प्रशासक प्रा. एस डी पाटील, महिला तालुका अध्यक्षा कुसुम पाटील, जिल्हा महीला पदाधिकारी अॅड. मनिषा पवार, संगीता नेवे, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष शरीफ खाटीक,युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड अबांदास गिरी, प्रकाश चव्हाण, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी संपूर्ण सप्ताहाचे नियोजन करण्यात आले. यात काही आंदोलने तर काही सामाजिक उपक्रमे राबविण्यात येणार आहे. तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, तालुक्यात आणि शहरातील कॉग्रेस मध्ये इनकमिंग सुरु झाली असून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय फक्त कॉग्रेस देऊ शकतो. कॉग्रेस हा पक्ष नसुन धर्मनिरपेक्ष विचार धारा आहे. येणाऱ्या काळात कॉग्रेस ला तालुक्यात गतवैभव प्राप्त करून द्यायचे आहे. कॉग्रेस वर तालुक्यात खुप लोक प्रेम करतात त्यामुळे अशा लोकांना पुन्हा कॉग्रेसशी जोडणे गरजेचे आहे.युवकांना जास्तीत जास्त जोडले जाणार आहे. तालुक्यात आणि शहरातील नागरिकांच्या न्याय हक्का साठी लढा देणार असून सामाजिक उपक्रम कॉग्रेस राबविणार असल्याचे श्री. सोमवंशी यांनी शेवटी सांगितले. बैठकीला जिल्हा अल्पसंख्यक उपाध्यक्ष इरफान मनियार, आरोग्य सेवा सेल तालुका अध्यक्ष डॉ फिरोज शेख, इस्माईल तांबोळी, युवक विधानसभा अध्यक्ष संदीप पाटील, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, कल्पेश येवले, शीला सुर्यवंशी, दिपक पाटील, समाधान पाटिल, गणेश पाटील, संजय सोनार, ज्ञानेश्वर पाटील आदी उपस्थित होते