Home महाराष्ट्र वांबोरी घाटात गोणीत घालुन टाकलेला मृतदेह टाकळीमियाॅ येथील किरण कवाणे या तरूणाचा,खुन...

वांबोरी घाटात गोणीत घालुन टाकलेला मृतदेह टाकळीमियाॅ येथील किरण कवाणे या तरूणाचा,खुन करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, पोलीसांकडून दोन संशयीत ताब्यात ?

वांबोरी घाटात गोणीत घालुन टाकलेला मृतदेह टाकळीमियाॅ येथील किरण कवाणे या तरूणाचा,खुन करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, पोलीसांकडून दोन संशयीत ताब्यात ?

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

खुन करून मृतदेह खताच्या मोकळ्या झालेल्या गोणीत घालुन वांबोरी घाटातील खोल दरीत फेकला होता.पोलीसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरून सदर मृतदेह हा अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथिल किरण शिवाजी कवाणे या तरूणाचा असल्याची माहिती मिळवण्यात यश मिळवले होते.या बाबद दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या कडून कसुन चौकशी सुरू आहे. या बाबतची माहिती अशी की दिनांक १७ फेब्रुवारी रोजी अमावस्येच्या दिवशी सकाळी साडे आकरा वाजण्याच्या सुमारास अहिल्या नगर तालुक्यातील डोंगरगण शिवारात असलेल्या वांबोरी घाटात अंदाजे ३२ वर्षे वयाच्या तरूणांचा मृतदेह खताच्या गोणीत घालुन खोल दरीत फेकून दिल्याचे आढळून आले होते. या बाबत एम आय डी सी पोलिसांना माहिती दिली होती.त्यांनी तातडीने अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. आणि येथिल सहाय्यक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांनी त्वरित घटनास्थळी भेट देवून सदर मृतदेह खोल दरीतून बाहेर काढून तो उत्तरीय तपासणीसाठी अहिल्या नगर येथील सरकारी रुग्णालयात पाठवून दिला होता. अहिल्या नगरचे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे साहेब, नगर ग्रामीणचे उप अधीक्षक शिरिष वनमे साहेब, शहर विभागाचे पोलिस उप अधीक्षक डॉ दिलिप टिपरसे साहेब,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण कबाडी साहेब,यांनी तातडीने घटनास्थळी भेट देवून पाहणी केली होती.सदरचा मृतदेह पायाकडून एक गोणी आणि डोक्याकडून एक गोणी घालून खोल दरीत फेकून दिल्याचे आढळून आले होते.पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथकास आणि फाॅरेन्सीक लॅबोरेटरीच्या डॉक्टरांना पाचारण केले होते.उत्तरीय तपासणीत हा खुनाचाच प्रकार असल्याचे डॉक्टरांनी आपल्या अहवालात स्पष्ट सांगितले होते.सदर मृतदेहाच्या उजव्या हाताच्या मनगटावर “छत्रपती” तर छातीवर “सोनाली”असे इंग्रजीत गोंदलेले होते.पोलिसांनी ही माहिती सोशल मीडियावर टाकली होती.मयताच्या कुटूंबाची ओळख पटविण्यात आणि मयताचे नाव उघड करण्यात पोलिसांना यश आले होते. छत्रपती यांची जयंती साजरी करण्या अगोदरच किरण कवाणे हे मयत झाले होते.मोठ्या शोकाकुल वातावरणात टाकळीमीया येथे रात्री उशिरा त्यांच्या वर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.किरण शिवाजी कवणे हे टाकळीमीया, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर येथील रहिवासी असुन त्यांचा कुक्कुट पालनाचा व्यवसाय होता.खुनाचा तपास करीत असताना वैद्यकीय अहवाल आणि परीसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून रात्री उशिरापर्यंत तपास केला होता.किरण कवाणे यांचे मोबाईल डिटेल्स तपासण्यासाठी त्यांचे सीडीआर काढण्याच्या दृष्टीने पोलिस तपास सुरू आहे. खुनाच्या संदर्भात पोलिसांच्या तपासात अनेक गोष्टी उघड होणार आहेत.”कानून के हाथ, बहोत लंबे होते है” या चित्रपटातील वाक्याची आठवण आल्या शिवाय रहात नाही. क्रमशः …

Don`t copy text!