ग्लोबल महाराष्ट्र न्यूज कार्यालयाचे शानदार उद्घाटन

ग्लोबल महाराष्ट्र न्यूज कार्यालयाचे शानदार उद्घाटन

पाचोरा – महाराष्ट्रातील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, यासोबतच शहरी आणि ग्रामीण जनजीवनावर प्रकाश टाकणारे साप्ताहिक ग्लोबल महाराष्ट्र व ग्लोबल महाराष्ट्र न्यूज पोर्टल कार्यालयाचे उद्घाटन दिनांक 15 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता भाजपाचे पाचोरा तालुका अध्यक्ष युवानेते अमोल भाऊ शिंदे यांच्या हस्ते करण्यात झाले.

पाचोरा येथील “पाचोरा सेंट्रल” इमारतीच्या तळमजल्यावर गाळा क्रमांक 2 मध्ये युवानेते अमोल भाऊ शिंदे यांच्या शुभहस्ते फीत कापून ग्लोबल महाराष्ट्र न्यूज कार्यालयाचे उद्घाटन झाले. या निमित्ताने अमोल भाऊ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रम प्रसंगी निमंत्रक तथा ग्लोबल महाराष्ट्राचे मुख्य संपादक प्रा. शिवाजी शिंदे, पंचायत समितीचे माजी सभापती बन्सीलाल (बापू) पाटील, प्रदीप नाना पाटील,युवा उद्योजक किशोरआबा पाटील, ज्येष्ठ पत्रकार प्रा. सी. एन. चौधरी, पत्रकार संदीप महाजन, पत्रकार मिलिंद सोनवणे, पत्रकार दिलीप पाटील, पत्रकार प्रतिक महाजन, पत्रकार अनिल येवले, पत्रकार धनराज पाटील, चंद्रकांत पाटील सर, स्वप्निल बागुल, निलेश भाई कोटेचा, गिरीश दुसाने, प्रमोद गरुड, शिवाजी बागुल, सिद्धांतभाऊ पाटील, दीपकदादा माने, सोहन मोरे, योगेश ठाकूर, राहुल बावचे सर, रामा जठार, प्रशांत सोनवणे (छंनूआबा), लोकेश पवार, कैलास काका पाटील, गोकुळ पाटील, हिमांशू जैन कुणाल मोरे, सह विविध वृत्तपत्र, वेब पोर्टल चे पत्रकार बांधव व सहकारी मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.