बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त आयोजित भव्य रंगभरण चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रंगभरण चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद !

पाचोरा- स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त आयोजित भव्य *रंगभरण चित्रकला स्पर्धेला* विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवून रंगांची उधळण केली.
प्रथमतः निर्मल फाउंडेशनचे अध्यक्षा *आदरणीय सौ. वैशाली सुर्यवंशी यांच्या शुभहस्ते* व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्ज्वलन करून रंगभरण स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.स्पर्धेसाठी *वर्गनिहाय वेगवेगळे गट तयार करण्यात आले होते इ.1 ली ते 4 थी साठी ‘अ’ गट,इ.5 वी ते 7 वी करिता ‘ब’ गट,इ. 8 वी ते 10 वी साठी ‘क’ गट आणि इ. 11 वी ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ड’* गट असे वर्गीकरण करण्यात आले होते. स्पर्धेला *सुमारे 1052 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.* सुटीचा दिवस असल्यामुळे सर्वच विद्यार्थी आपल्या कलेतून रंगांची उधळण करण्यात अतिशय मग्न होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसांडून वाहत होता.
सौ. वैशाली सुर्यवंशी यांनी आपल्या मनोगतात स्पर्धेत सहभागी असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक करत त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात व *अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांच्या सुप्त क्षमतांना वाव मिळण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन खूप महत्त्वाचे असते असे नमूद केले.*
याप्रसंगी शिवसेनेचे माननीय श्री. उद्धव मराठे, श्री. दीपक राजपूत, श्री. रमेश बाफना, श्री. शरद पाटील, श्री. सुनील सावंत, श्री. दीपक पाटील, श्री संदीप जैन, श्री हरेश देवरे, श्री. प्रशांत पाटील, श्री.जगदीश महाजन, श्री. फकीरचंद पाटील श्री दत्ताभाऊ जडे श्री. अभिषेक खंडेलवाल श्री. कृष्णा व्यास, श्री. जितेंद्र जैन श्री. किरण पाटील श्री. प्रतीक पाटील, नगरसेवक दादा चौधरी, आनंद संघवी, बंडू पाटील, आदी पदाधिकारी तसेच मान्यवर उपस्थित होते. श्री. सुबोध कांतायन, श्री. गो से हायस्कुल, पाचोरा,परशुराम पवार सर, श्रीमती के. एस. पवार आश्रमशाळा वरसाडे तांडा
प्रा.संदीप पाटीलसर ,अ. दि चित्रकला महाविद्यालय, पाचोरा यांच्या मार्गदर्शनातून स्पर्धा संपन्न झाली.प्रदीप सोनार सर ,जे. जी. पंडित माध्य.विद्या. लोहारा
प्रा.निलेश शिंपी सर , अ. दि चित्रकला महाविद्यालय, पाचोरा
प्रशांत सोनवणे सर , डॉ. आर. एम. एल. हायस्कूल, राणीचे बांबरुड या सर्व कलाशिक्षकांची स्पर्धेसाठी उपस्थिती लाभली. निर्मल इंटरनॅशनल स्कूल मधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. यावेळी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच प्रास्ताविक श्री. नाना वाघ यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्री.फकीरचंद पाटील यांनी अभिव्यक्त केलेत. *या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा दि.28 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी 5:00* वा.’शिवतीर्थ’ जय किसान कॉलनी, भडगाव रोड,पाचोरा येथे करण्यात येणार आहे असे आयोजकांकडून नमूद करण्यात आले.