मढीच्या कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्ष पदी विठ्ठल मरकड यांची तर सरचिटणीस पदी सौ माधुरी मरकड यांची निवड

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
संपूर्ण महाराष्ट्रात भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथिल कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या नव निर्वाचित अध्यक्ष पदी विठ्ठल राधाकिसन मरकड तर सरचिटणीस पदी सौ माधुरी गणेश मरकड यांची निवड करण्यात आली. कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या कार्यालयात सर्व विश्वस्तांची बैठक आयोजित करण्यात आली होती.त्या बैठकीत ज्या निवडी जाहीर करण्यात आल्या त्या पुढील प्रमाणे आहेत.१) विठ्ठल राधाकिसन मरकड -[अध्यक्ष],२) सुरसिंगराव माधवराव पवार -[उपाध्यक्ष],३)सौ माधुरी गणेश मरकड -[सरचिटणीस], ४) अनिल अशोक साठे -[चिटणीस],५) दादासाहेब शिवराम मरकड- [कोषाध्यक्ष],६) महादेव बबन कोकाटे -[कार्याध्यक्ष],७) उत्तम शंकरराव मरकड -[विश्वस्त],८) तानाजी रामचंद्र धसाळ -[विश्वस्त],९) तानाजी हिरामण शिंदे -[विश्वस्त],१०) मदन विष्णू मरकड -[विश्वस्त],११)सौ.उषा संतोष मरकड -[विश्वस्त] या प्रमाणे एकूण ११ जणापैकी ६ पदाधिकारी आणि ५ विश्वस्तांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.या कार्यकारी विश्वस्त मंडळाचा कार्यकाळ हा दिनांक १९ जानेवारी २०३१ पर्यंत वैध राहील.नवीन पदाधिकाऱ्यांनी या देवस्थान च्या कार्यकारी मंडळात कोणत्याही प्रकारची गटबाजी न करता सर्वांना विश्वासात घेऊन नाथ महात्म्य व नाथभक्त वाढीसाठी आपला अमूल्य वेळ देऊन कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचा स्वच्छ कारभार केला जाईल असे आश्वासन दिले.शेवगाव -पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या हॅट्ट्रिक आमदार मोनिकाताई राजळे यांनी आजपर्यंत गडाच्या विकास कामांसाठी मागिल मंडळास शासन स्तरावरून फार मोठा भरीव स्वरूपात निधी उपलब्ध करून दिला होता.नवीन विश्वस्त मंडळ ही आमदार मोनिकाताई राजळे यांच्या मार्गदर्शना खाली या गडाचा स्वच्छ कारभार करील असे नविन कार्यकारी विश्वस्त मंडळा कडून सांगण्यात आले आहे.नवीन कार्यकारिणी सदस्यांनी कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या गडाच्या विकास कामाची माहिती समजावून घेतली.आगामी यात्रा उत्सव काळात करावयाच्या उपाययोजना संबंधी कामाचा तपशील लक्षात घेऊन पुढील वाटचाली साठी सुरुवात केली आहे.कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थानच्या कर्मचारी वर्गाच्या वतीने नविन विश्वस्तांना पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.प्रारंभी स्वागत मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पवार यांनी केले तर आभार व्यवस्थापक संजय मरकड यांनी मानले.
























