पाचोरा भाजी मंडीतील अतिक्रमण साठी शहरातील छोट्या अतिक्रमण धारकावर कार्यवाही का?

पाचोरा भाजी मंडीतील अतिक्रमण साठी शहरातील छोट्या अतिक्रमण धारकावर कार्यवाही का?

नगरपालिका कडून शहरातील भाजीपाला धारकासाठी ओटे बांधून दिले गेले पण ते तिथे बसत नाही म्हणून अतिक्रमण चे हत्यार वापरून शहरातील इतर भागातील छोट्या अतिक्रमण धारकावर कार्यवाही करणे योग्य नाही. कोरोना व पुर्वी लागलेली लाॅकडाऊन या मुळे हातावर पोट असणारा अतिक्रमण धारक पहिलेच हवालदिल झाला असुन त्यात आता नगरपालिका ची सूडबुद्धीने होणारी कार्यवाही निश्चित सर्व सामान्य माणसाला आयुष्यातुनच उठवुन राहणार आहे का.

लोकप्रतिनिधी, सर्व राजकीय पक्ष व पदाधिकारी यांनी सदरील कार्यवाही थांबवुन छोट्या व्यवसायावर अवलंबून असणारे अतिक्रमण धारकांना न्याय मिळवून द्यावा.