बाप लेकीच्या नात्याला कलंक,हिंगणगावात नराधम बापानेच केला पोटच्या मुलीवर बलात्कार,फरार आरोपीला शेवगाव पोलिसांनी केले चोवीस तासात गजाआड

बाप लेकीच्या नात्याला कलंक,हिंगणगावात नराधम बापानेच केला पोटच्या मुलीवर बलात्कार,फरार आरोपीला शेवगाव पोलिसांनी केले चोवीस तासात गजाआड

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणारी आणि बाप लेकीच्या नात्याला कलंक लावणारी घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील हिंगणगाव येथे घडली आहे. याबाबतची घटना अशी की एका अल्पवयीन मुलीचे वडील संशयित आरोपी एकनाथ जयराम भोसले वय (वर्षे ५४) राहणार हिंगणगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर या नराधमाने फिर्यादी पिडीत आपली मुलगी हीस हींगणगावातील उसाच्या शेतात घेऊन जाऊन आणि तीला चाकूचा धाक दाखवून व जिवे ठार मारण्याची धमकी देऊन फिर्यादी पिडीत मुलीसोबत बळजबरीने शारीरिक संबंध करून बलात्कार केल्याच्या फिर्यादी वरून शेवगाव पोलिस स्टेशनला दिनांक ३० मे २०२५ रोजी रात्री १ वाजून ५ मिनिटांनी गुन्हा रजिस्टर नंबर ४८५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ६४(२),६५(१),लैंगिक अपराधापासुन बालकांचे संरक्षण अधिनियम कलम २०१२ चे कलम ४,६,८,१० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित आरोपी एकनाथ जयराम भोसले हा फरार झाला होता.शेवगाव पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना दिनांक ३०/५/२०२५ रोजी गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की आरोपी हा बाहेरगावी पळून जाण्याच्या तयारीत आहे. पोलिस निरीक्षक समाधान नागरे यांनी एक पोलिस पथक तयार करून आरोपीच्या मागावर पाठवले.आरोपी हा नेवासा रस्त्याने भातकुडगाव फाटा मार्गे ट्रकमध्ये बसून पळून जात असताना शेवगाव पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीने आणि कौशल्याने रंगेहाथ पकडून त्याच्या मुसक्या आवळल्या.आणि त्यास शेवगाव पोलिस स्टेशनला आणून त्याला नमुद गुन्ह्यात गजाआड केले आहे. या पुर्वीही शेवगाव पोलिस स्टेशनला संशयित आरोपी एकनाथ भोसले यांच्या विरोधात खुन, खुनाचा प्रयत्न,अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. सदरची कारवाई ही अहिल्यानगर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब,अप्पर पोलीस जिल्हा पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे साहेब, शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक समाधान नागरे, पोलिस सब इन्स्पेक्टर प्रविण महाले, पोलिस हेड कॉन्स्टेबल किशोर काळे,चंद्रकांत कुसारे, पोलिस कॉन्स्टेबल शाम गुंजाळ, राहुल खेडकर, धनेश्वर पालवे, संपत खेडकर, संतोष वाघ, तसेच अहिल्या नगर दक्षिण सायबर सेलचे पोलिस काॅंन्स्टेबल राहुल गुड्डू आणि पोलिस कॉन्स्टेबल शिंदे यांनी केली आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अशोक काटे हे करीत आहेत.बाप लेकीच्या पवित्र नात्याला कलंकित करणारी ही घटना घडली आहे.